सुप्रसिद्ध जापनीज ओकिनावा ई मोटर्स बाईक आता कडेगावात.
कडेगांव:प्रतिनिधी
जापनीज तंत्रज्ञानाच्या पेट्रोल विरहित व प्रदूषण विरहित अशा अत्याधुनिक ओकिनावा इलेक्ट्रिक व्हेईकलच्या शोरूमचे भव्य शुभारंभ आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर कडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या हस्ते, कडेगावं विटा रोड, भारती विद्यापीठासमोरील दालनात कडेगावं येथे करण्यात आला.
कार्यक्रमास तोंडोलीसह पंचक्रोशीतील तसेच कडेगाव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
तोंडोली(तालुका कडेगाव) येथील प्रतिष्ठित गुरुवर्य माजी मुख्याध्यापक श्री के एस मोहिते यांचे चिरंजीव श्री संदीप कृष्णराव मोहिते यांनी सुरू केलेल्या एम के इ मोटर्स या शोरूम मध्ये आकर्षक रंगाच्या अत्याधुनिक अशा ओकिनावा इ-बाईक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत जापनीज तंत्रज्ञानाच्या या अत्याधुनिक ई-बाईक्समुळे ध्वनी तसेच वायू प्रदूषणास आळा बसतो या ई बाईक्स इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या आहेत केवळ २ रुपया पेक्षा कमी दरात १० किलोमीटर च्या average यामुळे पेट्रोलच्या खर्चापासून मुक्ती मिळते.
पर्यावरण पूरक वाहने लवकरच ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या वेळी उत्कृष्ठ उत्पादन आणि सर्वोत्कृष्ट विक्रीपश्च्यात सेवेचा मनोदय श्री संदीप मोहिते आणि संचालिका सौ सीमा मोहिते यांनी व्यक्त केला.







