सदगुरु श्री श्री गोशाळा येथे बेंदुर सण उत्साहात साजरा….
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
मुक्या जनावरांची दिवळी म्हणुन संबोधला जाणारा बेंदुर हा सण सद्गुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी च्या गोशाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सद्गुरु कारखान्याने जवळपास पाचशेहुन अधिक देशी खिलार गाई बैलांची गोशाळा तयार केली आहे.
ज्या शेतकर्याना चारा नाही अशी शेतकरी मंडळी सद्गुरु गोशाळेत देशी गुरांना सोडतात. सद्गुरु चे चेअरमन शेषागिरी राव अंकल यांना देशी खिलार गुरांचा विशेष लोभ असलेमुळे ते प्रत्येक गुरांना पोटच्या लेकरासारखे संभाळा म्हणुन कर्मचारी वर्गाला सतत सुचना देतात.
दिवसभर कारखाना मिटींग संपल्यानंतर संध्याकाळी राव अंकल गोशाळेत थेट येतात आणि खिलार गाईना कुरवाळत आनंदाने पाठीवर थाप टाकतात.
काल बेंदुर सणासाठी चेअरमन साहेबांनी स्वत वेळ काढुन गुरांना लागणारे नवीन कासरे,घुंगरे,कंडे दोरे,कलर,बेगड,वेसन,म्होरकी साहित्य खरेदी केले. सणादिवशी गोशाळा कर्मचार्यांनी सकाळी सर्व गुरांना स्वच्छ धुतले रंगरांगोठी केली व सर्व नवीन साहित्य गुरांना परिधान केले.
दुपारी चेअरमन शेषागिरी राव अंकल,संचालक मोहन आप्पा बागल,केन मॅनेजर सुनिल सावंत, गोशाळा प्रमुख सुरेश घाडगे,सुनिल चव्हाण, चंदु सावंत,नारायण खरात,सयाप्पा माने, सुरेश खरात , सचिन सावंत यांच्या उपस्थित सर्व गुरांचे पुजन करुन नैवेद्य अर्पित करण्यात आला. बेंदुर सणामुळे अप्रतिम तेज गोशाळेला आले होते







