तऱ्हाडी येथे अतिक्रम केलेल्या व्यक्तींना सर्वांसाठी घरे या धोरणांतर्गत मिळाली घरे
तऱ्हाडी:-महाराष्ट्राच्या ग्रामविकास कार्यालयामार्फत शासनाने सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाचे अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील अतिक्रमण केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावे पर्यायी घर नसण्याची खात्री करून झाली आहे
अशा अतिक्रमण क्षेत्रातील पाचसे चौ.फुट पेक्षा कमी असलेल्या अशा जागेवर अतिक्रमण असल्याची खात्री करून अशा नागरिकांना शासकीय जमिनीवर निवासी नियोजनासाठी केलेली अतिक्रमण निवास नियमानुकूल धोरणाच्या अंमलबजावणी केली
असून तऱ्हाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तऱ्हाडी. ममाने व अभाणपूर येथील अशा चौदा अतिक्रमणधारकांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे असे अतिक्रमणधारकांना शासनातर्फे आलेल्या आदेशाचे वाटप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर ग्राम विकास अधिकारी अविनाश बैसाणे. गटनेते तुळशीराम भामरे. सुनील धनगर. लाभार्थी व ग्रामस्थ
उपस्थित होते
फोटो – शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना घरे या धोरणांतर्गत प्रमाणपत्र देताना सरपंच जयश्री धनगर, ग्रामविकास अधिकारी अविनाश बैसाणे सुनील धनगर, तुळशीराम भामरे, विलास भामरे, संजय जाधव,ग्रामस्थ







