• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडीत कानुबाई माता उत्सव

माणगंगा by माणगंगा
July 18, 2022
in महाराष्ट्र
0
त-हाडीत कानुबाई माता उत्सव

त-हाडीत कानुबाई माता उत्सव

त-हाडी (प्रतिनिधी) महेंद्र खोंडे

त-हाडी तालुका शिरपुर येथे खान्देशाची आराध्य दैवत कानुबाई माता स्थापन आज दिनाक ३०/७/ २०२२ शनिवार रोजी होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार दिनाक ३०/७/२२रोजी उत्सवाची सुरुवात मातेचे रोट नेमण्यापासून होणार आहे दिनाक ३१/७/२२ मातेची स्थापना होणार आहे दिनाक१/८/२२रोजी तापीनदी परिसरात विसर्जन होणार आहे

विसर्जनाच्या दिवशी उत्सवाला उधाण आलेला असतो गावात कानुमाता स्थापनेचा उत्सव साजरा करण्यासाठी संरपच लोकनियुक्त श्रीमती जयश्री सुनील धनगर उपसंरपच उजनबाई अहिरे तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे , युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील धनगर व गावातील पोलीस पाटील श्री प्रतापसिंह गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली चर्चेअंत उत्सव साजरा करण्याचे ठरल्यानंतर दंवडी , गावातील व्हाट्सअप, ग्रुपमध्ये मेसेज देण्यात आली होती आणि तेव्हापासून वुद्ध ,महिला, पुरुष, उत्सवाच्या तयारीला लागले होते जागरणाच्या दिवशी विविध भक्ती पर कार्यक्रम होणार आहेत श्रवण महिन्यात येणारा हा उत्सव प्रत्येक गावात कुटुंबात साजरा केला

जातो यालाच कानबाईचा रोट असे म्हणतात कनुबाई उत्सवात रोट विधीला महत्त्व आहे ज्या ज्य घरात कानबाईची कुलाचाराने स्थापन केला जातो अशा सर्व कुटुंबात रोट केला जातात श्रावणातील हा उत्सव नागपंचमीनतर पहिल्या रविवारी येतो या रोटसठी गहू घेतले जातात ते सव्वा मापात घेतले जातात सव्वा शेर सव्वा पायली अशा प्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे एक मुठ याप्रमाणे यात वाढविली जाते एखाद्या घरात पुत्रप्राप्ती होणे व त्याच दिवशी त्या घरातील गाईला गो-हा होणे हा शुभसंकेत समजून येणाऱ्या श्रावणात कानबाईचे रोट केला जातात

उत्सव दरम्यान केलेला स्वयंपाक त्याच दिवशी न संपल्यास तो दुसऱ्या दिवशी खातात कानबाईची स्थापन करण्याची जागा प्रथम शेणाने सारवली जाते तेथे चैरग ठेवला जातो आणि त्यावर लाल वस्त्र टाकून मुखवटा किंवा नारळ ठेवतात त्या नारळाच्या किंवा मुखवट्याला सर्व प्रकारचे दागिने चढवून त्याची पूजा केली जाते कुंकू बिदी नथ चढविली जाते भोजनासाठी तांदळाची खीर गंगाफळ किल्लु तांदूळी आदी भाज्या शिजवलेले हरभरे व डाळ वाफलेले मठ पदार्थ असतात स्वयंपाकासाठी सर्वत्र चुलीचाच वापर होते

नैवेद्य

पोळ्याना रोट तादळाच्या खिरीस साखर शिजवलेल्या हरभऱ्याना मनुका नारळ भातास मोगरा अशा विशिष्ट नावाने संबोधले जाते कानबाईच्या नैवेद्य चा रोट खाण्याचा अधिकार फक्त कुटुंबातील व्यक्तीनाच किंवा भाऊबंदकीतील लोकानाच असतो रविवारी स्थापना केलेल्या कानबाईचे सोमवारी वाजत गाजत विसर्जन केले जाते विसर्जनाच्या वेळी कानबाई समोर पाणी व कुंकूवाचे सडे टाकले जातात नदीकठी कानबाईचे विसर्जन करतात विसर्जनाच्या ठिकाणावरील वाळू घरी आणून तिचे कस्तुरी म्हणून जतन केले जाते कानबाई विसर्जनानतर घरामध्ये लावलेला दिवा पौर्णिमेपर्यत तेवत ठेवला जाते ही प्रथा अजूनही काही ठिकाणी सुरू आहे


आई आतिथ्य हे घेई
रिमझिम पाऊस
तुझ्या स्वागताला येई
नदी नाल्यालाही पाणी
बघ आले लवलाही !!धु!!
उत्सवाला तुझ्या बघ
सारे गणगोत येई
घर भरले माझे ग
आनंदाला सीमा नाही!!१!!
कानु -कन्हेर गाण्याची
झाली माझी गीताई
स्थापनेला कानबाई
उणे राहिले का नाही!!२!!
दोन दिसाची पाहुणी
आई आतिथ्य हे घेई
आतिथ्याला तुझ्या बाई
कमी पडावे न काही!!३!!
राहिलीच काही चूक
क्षमा करशील आई
सुखी समुध्द खान्देश

तुझ्या आशीर्वादाने होई!!४!!

महेंद्र खोंडे त-हाडी
ता शिरपुर जि धूळे

Views: 269
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डोंगरगाव विकासो निवडणूक बिनविरोध..

डोंगरगाव विकासो निवडणूक बिनविरोध..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)