त-हाडी परिसरात. रासायनिक शेती भावी पिढीला ठरणार धोकादायक
आधिक उत्पन्नाच्या नादात जमिनीचा कस खालावला,उत्पादनही रोगट सेंद्रिय खतांची गरज; डॉ.प्रा. दिलवरसिंग गिरासे
त-हाडी प्रतिनिधी
त-हाडी उत्पादन वाढीकरिता शेतामध्ये आपण रासायनिक खत आणि किटकनाशकाचा वापर वाढला आहे. औषध आणि खतातील रसायन मिसळून अन्नधान्य, भाजीपाला व फळेशुद्धा विषयुक्त झाले आहे. हा विषयुक्त आहार मानसाला आजारी व अशक्त बनवत असून रासायनिक शेती भावी पिढीला धोकादायक आहे.एवढेंच काय तर शेत जमिनीचा सुदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय शेती आत्यवशक झाली आहे.चांगले उत्पन्न वाढीस लागण्याकरीता शेतकरी शेतात मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करतात. पिकावर कीडीचे प्रमाण वाढले आहे. कीड नियंत्रणासाठी वेगवेगळ्या किटकनाशकाचा वापर केला जातो.
खतातील रसायन आणि किटकनाशकातील रसायन अन्नधान्य, भाजीपाला व फळमध्ये शुद्धा मिसळून हा आहार विषयुक्त झाला आहे. एवढेच काय तर दुधदेखील विषयुक्त झाली आहे. किटकनाशकाचा वापरामुळे चिंच, आवळा,बेहडा आदी झाडाच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. खत आणि किटकनाशक उत्पादन कंपन्या आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. भारतात दरवर्षी २५० मिलिमन मँटिक टन रासायनिक खताचे उत्पादन केले जाते. अधिक प्रमाणात रासायनिक खत व किटकनाशकाच्या अति वापरामुळे शेताचा कस कमी झाला आहे.
मानवी हामीँन्समध्ये बदल होत आहे. मुली लवकर वयात येणे,लहान वयातच केस पांढरे होणे,अन्नातून हवे ते प्रोटीन न मिळणे,सुस्त वाटणे,वेळेच्या आतच वृढच येणे आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.वर्तमान स्थितीत भांडवलशाही राजकारणात शेतकरी वापरापुरातच करता ठरला आहे. आपण आज पोटात केवढं विष टाकत आहोत. रासायनिक खताचा वापर सुरुच राहिल्यास भावी पिढी कमजोर अल्पापुपी निघणार आहे.सुदृढ आरोग्यासाठी विषमुक्त अन्न हि काळाची गरज आहे.यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. सुदाम भलकार माजी सरपंच शेतकरी त-हाडी
▪️”” सन २०१७ – १८ मध्ये किटकनाशकाची विषबाधा होऊन विदर्भात अनेक शेतकरी आणि शेतमजूरांचा मृत्यू झाल्याच्या घटना आहेत. रासायनिक खतामुळे जमीन कठीण होत आहे. मशागत खर्च, उत्पादन खर्च वाढून शेतकरी कर्जबाजारी होत आहे.यास पर्याय म्हणून विषमुक्त सेंद्रिय शेतीस प्रोत्साहनासाठी सरकारने सेंद्रिय शेती धोरण मंजूर केले आहे.
जैविक पद्धतीने शेतमालाचे सेंद्रिय प्रमाणीकरण,प्रार्थमिक प्रकिया, बाजारपेठ,श्रंखला समृह गट स्थापन केल्यास।त्या माध्यमातून शेती उत्पादनाना बाजारपेठ व सोबतच योग्य भाव मिळू शकेल शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ नफ्यात वाढ होऊन तीन वर्षात दुपटीने उत्पन्न शक्य होईल यासाठीच शासनाने १६ आक्टोबंर २०१८ रोजी राज्य पुरस्कृत सेंद्रिय शेती विषमुक्त शेती योजना राबविण्याला मान्यता दिली.
डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे ( कै साहेबराव सोमा पाटील उच्च माध्यमिक विद्यालय त-हाडी)







