आढे येथील जि.प.मराठी शाळेत शिक्षकांची तत्काळ नियुक्तीसाठी गटशिक्षण अधिकारी आर.के गायकवाड यांना क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचे निवेनाद्वारे मागणी
त-हाडी – प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील आढे येथील जि.प.मराठी शाळेत तत्काळ शिक्षकांची नियुक्ती होण्यासाठी शिरपूर येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयात गटशिक्षण अधिकारी आर.के.गायकवाड यांना क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष तथा पोलीस पाटील राजकिरण राजपूत,उपाध्यक्ष डी.एल.राजपूत यांनी निवेदन देऊन मागणी केली.यावेळी गटशिक्षण अधिकारी यांनी आश्र्वस्त केले.व शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वानखेडे आणि केंद्रप्रमुख वसंत कोळी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून दोन दिवसात शिक्षक हजर होतील असे सांगितले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे गावातील जि.प.मराठी शाळा,आढे येथे सद्यःस्थितीत चार वर्गासाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत.त्यातील श्री.मधुकर पंडित पवार हे उपशिक्षक आजारपणामुळे सतत रजेवर असतात.त्यामुळे चार वर्गांसाठी एकच शिक्षक श्री.सुरेश माळी हेच कार्यरत असल्याने एक शिक्षकाला चार वर्गांना अध्यापन करण्यास अडचण निर्माण होत आहे.यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कोविड काळात सुमारे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचा पालकांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांना क्लास लावता आले नाहीत.व अल्पशिक्षित असल्याने त्यांना आपल्या मुलांना शिकवीता आले नाही.यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झालेले आहे.आता विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान थोड्याफार प्रमाणात कमी करता येईल.याकरिता आपण आढे येथील जि.प.मराठी शाळेत शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करावी.अशी विनंती करण्यात आली .







