मौजे अंतुर्ली शिवारात आढळली अजगर ची अंडी
त-हाडी
अंतुर्ली येथील शेतकरी गोकुळ पौलाद ईशी यांचा शेतात मशागत ची कामे करीत असताना त्यांना अंडी दिसूनृ आली सदर अंडी वेगळी असल्याचे त्यांचा लक्षात आले त्यावरून त्यांनी वनक्षेत्रपाल आंनद मेश्राम व नेचर काँजेर्वेशन फोरम शिरपूर चे योगेश वारुडे( प्राणी मित्र) यांच्याशी संपर्क केला. योगेश यांनी फोटो वरुन अंडी अजगराची आहेत सुचवून त्यांचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे सांगितले.
ही माहिती मिळताच अंतुर्ली भागाचे वनपाल संदीप
मंडलिक तसेच सर्पमित्र महेश करंकाल हे घटना स्थळी पोहोचले अजगर हा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चा अनुसूची 1 मधील प्राणी आहे त्याचे संरक्षण व संवर्धन करणे महत्त्वाचे कार्य आहे सदर शेतकरी ईशी यांनी जागरूक नागरिक सारखे वागून माहिती दिली नाही तर काही लोक भीती पोटी अंडे व पिल्लं नष्ट करून टाकतात व त्यावरून येणारी नवी पिढी चा नाश करतात मात्र गोकुळ पौलाद ईशी यांनी जागरूकता दाखवून माहिती दिली परंतु शेती असल्याने जागेवर
अंडे उबविणे शक्य नसल्याचे शेतकरी यांचे म्हणणे वरून
मौजे अंतुर्ली येथुन दिनांक 26 जून रोजी अजगर ची 14 अंडे ताब्यात घेतली व तेथून ती अंडी सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव व वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनान प्राणीमित्र योगेश वारुडे यांच्या देखरेखीखाली योग्य त्या जागी कृत्रिम पणे उबविण्यात आली व त्या मधून आज 13 पिल्लं बाहेर निघाले असून सदर पिल्लांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टर उमेश बारी यांनी सांगितले सदर कामी महेश करांकळ ,महेंद्र कोळी,यांनी देखरेख करून योग्य ती निगा राखली सदर पिल्लाना लवकरच महाशय सहाययक वनसंरक्षक अमितराज जाधव सर , तसेच आनंदकुमार मेश्राम साहेब वनक्षेत्रपाल बोराडी यांचा समक्ष नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल







