शिरपूर शहादा रस्त्यावरील तऱ्हाडी जवळ असलेल्या पुलाचे काम पाच वर्षापासून अपूर्णच
तऱ्हाडी:-महाराष्ट्र सह गुजरात. मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गावरील शिरपूर शहादा रस्त्यावरील तऱ्हाडी गावाजवळ असलेल्या पुलाचे बांधकाम गेल्या पाच वर्षापासून अपूर्णच आहे .या रस्त्यावर वाहनांची वर्दळ जास्त प्रमाणात असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठे खड्डे पडलेले आहेत
पावसाळा सुरू असल्यामुळे या ठिकाणी पाणी साचते पाणी साचत असल्याने मोटरसायकल व लहान वाहनधारकांना त्या खड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा अपघात झालेले आहेत
या पुलावरून वाहनधारकांना मोठी कसं करावी लागते गेल्या पाच वर्षात या पुलाची परिस्थिती अगदी दैनिय झाली आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दुर्लक्ष केले असून या पुलाच्या दुरूस्ती साठी तऱ्हाडी सह परीसरतील वाहधारकांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूर यांचे संपर्क साधला असता त्यांनी आमच्याकडे मजूर व डांबर उपलब्ध असल्याने आम्ही हे काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही
अशी तोंडी समज दिली तरी या पुलावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे काम पूर्ण करून वाहनधारकांना दिलासा मिळावा अशी मागणी तऱ्हाडी सह परीसरतील वाहन चालक यांनी केलेली आहे







