त-हाडी येथे साजरा होणार कानुबाई -राणुबाईमातेचा महोत्सव
त-हाडी -शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथे यावर्षी कानुबाई राणुबाई मातेचा उत्सव साजरा होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासंबंधी गावातील सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे ,सुनील धनगर, पोलीस पाटील प्रतापसिंह गिरासे तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे, विलास भामरे, संजय जाधव, यांनी व ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या प्रमाणात त सभा देऊन सर्व नागरिकांनी या उत्सवात सहभागी होण्याचे ग्रा.पं. प्रशासनाने आवाहन केले आहे.
कानुबाई मातेच्या या उत्सवाला ग्रामीण भागात रोट असेदेखील संबोधतात. गेल्या चार वर्षांपासून हा उत्सव त-हाडी येथे साजरा
झाला नसल्यामुळे गावकऱ्यांनी येथील ग्रा.पं. जवळ एकत्रित येत यावर्षी उत्सव साजरा करायचा, असे सर्वानुमते ठरविले
या उत्सवामुळे कुटुंबीयातील दुरावलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होत असल्याने एक वेगळेच महत्त्व प्राप्त होत असते. त्यामुळे ग्रामीण जनजीवन
गजबजून निघत असते. गावातील सर्वच नागरिक या विसर्जन मिरवणुकीत एकत्रित येत असतात तर बाहेरगावी असलेले भाऊबंद या उत्सवासाठी खास हजेरी लावत असतात. त्यामुळे भेटीचा दुर्मिळ योग येत असतो.
३१ रोजी स्थापना, १ रोजी विसर्जन
श्रावण महिन्याच्या सुरुवातीला ३० जुलै रोजी सप्त्या पुजन, ३१ जुलै रोजी सायंकाळी कानुबाई मातेची स्थापना, व १ ऑगस्ट रोजी सकाळी कानुमातेची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येईल. यासाठी सर्वच ग्रामस्थ आतापासून तयारीला लागले आहेत. महिलांनी घरातील साफसफाई करण्यासाठी सुरुवात देखील केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.







