पोदार जम्बो किड्स मायणी मध्ये पेरेंट्स डे उत्साहात साजरा
मायणी मध्ये पोदार ने आपली नवीन ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे . मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पोदार मध्ये घेतल्या जातात. मुलांचा सर्वांगीण विकास हे ध्येय अंतिम ठेवून पोदार नेहमीच मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असते. पोदार मध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलं प्रवेशित आहेत
एवढ्या लहान मुलांनी आपल्या अभिनयाने, वक्तृत्व कलेने उपस्थित लोकांची मने जिंकली. पेरेंट्स डे च्या निमित्ताने पालक आणि मुले दोघां च्या एकत्रित ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या. यामध्ये फॅशन शो डान्स, फनी गेम्स ,यासारख्या वेगवेगळ्या उपक्रमांचा सहभाग करण्यात आला. मायणी भाग ग्रामीण असून देखील यामध्ये समावेश झालेल्या पालकांचा उत्साह प्रचंड होता. आपल्या पाल्यामध्ये होणारा सर्वांगीण विकास पालक प्रत्येक टप्प्यावर पाहत आहेत.
भविष्यात पोदार जम्बो किड्स मायणी हे मायणी भागातील एकमेव अति उच्च दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येईल यात यात किंचितही शंका नाही. प्रत्येक कार्यक्रमाचे उत्तम नियोजन गुणवंत शिक्षक स्टाफ, उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित होईल असे प्रतिपादन याप्रसंगी संस्थेच्या सचिव सो आरती खिलारे यांनी केले. मायणी सारख्या ग्रामीण भागामध्ये अतिउच्च दर्जाचे शैक्षणिक केंद्र उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी संस्थेचे आभार मानले .
आमची मुलं नशीबवान आहेत म्हणून अशा जागतिक दर्जाच्या शाळेमध्ये त्यांना शिकण्याची संधी मिळाली हे आमच्या मुलांचे भाग्य असे प्रतिपादन उपस्थित पालकांनी याप्रसंगी केले.सदर कार्यक्रमांमध्ये ,महेश लोखंडे तोफिक तांबोळी ,संभाजी पवार सतीश मोहिते ,इमरान जमादार, सुशांत कोळी ,मंजुनाथ पाटील, सुधीर कदम ,सागर पवार, कुंडलिक मुंडे ,अशोक जाधव, महादेव पडळकर , इत्यादींनी फनी गेम्स मध्ये भाग घेतला.
रूपाली गायकवाड ,काजल पवार, मयुरी पवार ,सीमा कुंभार, डॉक्टर हबीबा सय्यद ,प्रीती कदम, काजल पवार ,मयुरी पवार, वैष्णवी देशमुख ,स्वाती धमाले, सरिता सुर्वे , डॉक्टर प्रतीक्षा देशमुख, डॉक्टर माधुरी कुंभार, स्वरांजली चव्हाण, प्रीती कदम, मयुरी लोखंडे ,मोनिका लकडे ,दिपाली लुकडे ,प्रियांका लोखंडे, प्रीती केराम, अश्विनी लोखंडे , सरिता चन्ने. इत्यादी महिलां पालकांनी फॅशन शो, आणि थीम फॅशन शो यामध्ये भाग घेतला.
काजल पवार, मयुरी पवार यांनी कोळी नृत्य सादर केले , इमरान जमादार ,महेश लोखंडे ,यांनी संगीत खुर्चीत क्रमांक मिळवला भाग घेतला तर स्फूर्ती खराडे , अश्विनी लोखंडे, या महिलांनी संगीत खुर्चीत क्रमांक मिळवला घेतला.
रत्नेशा शिंदे यांनी आभार मानले
कार्यक्रमाचे सूत्रंचालन रोहिणी बिरजे यांनी केले
यावेळी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन आरती खिलारे व पालक यांच्या हस्ते करण्यात आले







