शिंदखेडा तालुक्यातील रेशन दुकाने होणार आय एस ओ जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ. *.
डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील
दिनांक 26 जुलै 20 22 रोजी शिंदखेडा तहसिल कार्यालयात धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व शिंदखेडा तालुका तहसीलदार सुनील सैंदाणे अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे उपजिल्हाधिकारी शेळके साहेब तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे सर्व अधिकारी व तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी धुळे जिल्हासह शिंदखेडा तालुक्यातील रेशनिंग दुकाने आय एस ओ होणार आहेत यासंदर्भात अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केले यात पुरवठा विभाग ते तालुक्यातील सर्व दुकाने एकाच रंगाने रंगरंगोटी करण्यात येणार सर्वच दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार एकच पद्धतीचे बोर्ड असणार मेडिकल किट अग्निशामक यंत्र ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दुकाना साठी लागणारे अत्यावशक बोर्ड परिसर व दुकानात स्वच्छता दुकानदाराचा सारखाच पोशाख अद्ययावत सूव्यवस्थित दप्तर इत्यादी अनेक विविध बाबींवर सविस्तर चर्चा झाली
तालुक्यात 181 रेशनिंग दुकाने असून सर्वच दुकाने अद्ययावत व स्वच्छ व्हावीत व ग्राहकांना सुव्यवस्थित सुविधा कशी मिळेल व दुकानांमध्ये अति पारदर्शकता कशी येईल इत्यादी गोष्टींवर विवेचन केले संपूर्ण तालुक्यातील रेशन दुकानदार व शिंदखेडा तालुका रेशन संघटना अध्यक्ष आर आर पाटील यांनी आम्ही लवकरच तालुक्यातील रेशन दुकाने आयएसओ करून दाखवू असे आश्वासन देऊन प्रत्यक्ष कामास आजपासून सुरुवातही केली या मागे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ साहेब यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे







