तऱ्हाडी येथे सतत पावसाच्या रिमझिम मुळे धाब्याचे घर कोसळले
तऱ्हाडी:-गेल्या पंधरा दिवसापासून शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी सह परिसरात सतत रिमझिम पाऊस सुरू असल्याने गावातील शेतकरी आत्माराम सोनू बागुल यांचे यांची धाब्याचे घर दिनांक ने27 जुलै रोजी रात्री एक वाजता स्वतः मालक घरात झोपले असताना घराचा मधला भाग मोडून दाब्याचे घर कोसळले
पावसाची संततधार चालू असल्याने ग्रामीण भागात मातीची घरी असल्याने पावसामुळे ती माती ओली होऊन वजन झाल्याने हे घर कोसळले
कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे समजते संबंधित शेतकऱ्यांने महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे







