आटपाडी पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी
खरसुंडी यात्रेतून चोरीस गेलेली सोन्याची चैन फिर्यादीस मिळवून दिली
आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथे 27 मे 2022 रोजी सिद्धनाथ देवाची यात्रा भरली होती, या यात्रेतून राहुल मोहन देशमुख राहणार आटपाडी यांच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळ्याची चैन व पेंडल असे अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेले होते.
याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद झाला होता. या चोरीबाबत पोहेकॉ रमेश पाटील यांना अज्ञात चोरट्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने रेकॉर्डवरील महिला गुन्हेगार शहिदा महादेव तुपे राहणार पानवन ता.माण जिल्हा सातारा हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने तिला सदर गुन्ह्याच्या कामे अटक करून तिच्याकडून गुन्ह्यातील गुन्ह्याच्या कामे अटक करून तिच्याकडून पुण्यातील चोरीची चैन हस्तगत करण्यात आली आहे.
मा. न्यायालयामध्ये आदेशाने सदरची सोन्याची चैन व पेंडल असे मा उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांच्या हस्ते फिर्यादीस परत देण्यात आले .यावेळी फिर्यादी राहुल देशमुख यांनी आटपाडी पोलिसांचे आभार मानले. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे,पो.हे. कॉ. राकेश पाटील पोहेकॉ शैलेश कोरवी, पो.ना.अमोल कारळे पो.ना. नितीन मोरे ,प्रमोद रोडे, संभाजी सोनवणे यांनी केली आहे.
पोलिसांच्या या कामगिरीबद्दल तालुक्यातून सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.







