• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लांडोर बंगला

माणगंगा by माणगंगा
July 28, 2022
in महाराष्ट्र
0
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लांडोर बंगला

लेख :-

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लांडोर बंगला
( लळींग, धुळे ‌)

धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३७ साली भेट दिली होती. त्यानी तीन दिवस धुळे शहरातील लळींग किल्ल्याजवळील लांडोर बंगला येथे मुक्काम केल्याचे इतिहासात नमूद आहे.

पोळा सणात कोणाच्या बैल पुढे असावा या वादावरून शिरपूर न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर युक्तीवाद करण्यासाठी पी.ए. तवर यांच्या वक‌िल या नात्याने खटला चालविण्यासाठी ३१ जुलै १९३७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर धुळे शहरात आले. मुंबई ते धुळे असा रेल्वे प्रवास त्यांनी केला होता.

शिरपूर येथील त्यांचे न्यायालयीन कामकाज पूर्ण करून त्यांनी धुळे शहरातील संदेश भुमी ट्रावेल्स बंगला येथे पहिले भाषण केले व शहरातील विजयांनद चित्रमंदिर येथील सभागृहात जाहीर सभा घेवून बाबासाहेब यांचे भाषन झाले होते. दलित जनतेला मार्गदर्शन केले. त्यानंतर बाबासाहेब धुळ्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग येथील विश्वासू सहकारी पुनाजी आण्णा लळींगकर यांच्या सोबत लळींग येथील लांडोर बंगला येथे गेले. आपले आयुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वाहणाऱ्या बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी पुनाजी आण्णा लळींगकर यांची ओळख होती. त्यांच्या कणखर आवाज व तेवढेच कणखर नेतृत्व ते अधिकच प्रसिद्ध होते. निळी टोपी पांढरा नेहरू शर्ट पांढरा पायजामा खांद्यावर घोंगडी हातात ८ इंच ची काठी असा त्यांच्या पोषक होता. त्यांना बाबासाहेबांनी खान्देश च्या वाघ हि पदवी दिली होती. ते फौजी होते त्यांना बाबासाहेबांच्या उजव्या हात देखील म्हंटले जायचे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी या पार्टीचे हि नेतृत्व आण्णासाहेब पुनाजी लळींगकर यांनी केले होते. पुनाजी आण्णा लळींगकर यांच्या हट्टा मुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी लळींग गावाला भेट दिली होती. बाबासाहेब यांनी भोजन करून लांडोर बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करण्यात आल्या होत्या. या तीन दिवसांच्या मुक्कामात बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना, समाजाला आणि महिलांना मार्गदर्शन केले होते.

बाबासाहेबांचा आगमनाची बातमी कळताच धुळे शहरातील व लळींग परिसरातील अनेक गावाच्या असंख्य नागरिकांनी लांडोर बंगल्यावर मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली होती. बाबासाहेबांची अहिराणी गाणी म्हणत हातात रूमाल मध्ये बोंबील ची चटणी, कांदा व बाजरी ची भाकरी हे भोजन घेऊन महिला लांडोर बंगला येथे पोहोचल्या होत्या. उपस्थित जनसमुदाय पाहुन जनसमुहाला संबोधित करून आपला अनमोल संदेश बाबासाहेबांनी दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की अंधश्रद्धा मोडा व आपल्या मुले बाळांना शिकवा मुले शिकलीत तर सामाजिक परिवर्तन होऊन मोठी क्रांती घडेल असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला होता.

डॉ बाबासाहेबांच्या या बंगल्याच्या वास्तुस भेट देण्यासाठी असंख्य पर्यटक येतात. दर वर्षी ३१ जुलै या दिवशी लळिंग येथील लांडोर बंगला परिसरात मोठ्या उत्साहात भीम स्मुती यात्रा भरते व विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते.

डॉ.बाबासाहेबांनी ज्या बेडवर विश्राम केला होता. तो बेड देखील जतन करण्यात आलेला आहे. तसेच अलीकडे त्याच खोलीत बाबासाहेबांचा एक सुंदर अर्धकृती पुतळा देखील बसविण्यात आलेला आहे.

३१ जुलै १९९२ पासून प्राध्यापक जे.जी. खैरनार यांनी यात्रेची सुरुवात केली आहे. आज या यात्रेचे ३० वे वर्षे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला जवळपास आज ८५ वर्षे पूर्ण होत आहेत.

ज्या प्रकारे चैत्यभूमी दादर मुंबई, महु जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी तर थेट स्मृतीभूमी म्हणून ओळखलं जावं अशी तमाम दलित बांधवांची इच्छा आहे म्हणून बाबासाहेबांनी जो परिवर्तनाच्या संदेश या ठिकाणी दिला होता त्याला उजाळा देण्यासाठी व त्याचे पवित्र स्मृती जपण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी 31 जुलै रोजी देशभरातून असंख्य दलित बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात. सर्व बहुजन समाजातील लोक, दलित नेते विविध संघटनांचे पदाधिकारी येऊन अभिवादन करतात.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यात का आले हि माहिती सर्वांना व्हावी व समाजात परिवर्तन घडून हि माहिती जन सामान्यान पर्यंत पोहचावी हि अपेक्षा व प्रयत्न सदिच्छा..

३१ जुलै रोजी भिमस्मृती मेळाव्यास येणाऱ्या सर्व भिम अनुयायांना मंगलमय शुभेच्छा..

नमो बुद्धाय..
जय भिम..


लेख :

• अजय नवल कढरे, विद्यार्थी

टेंभे बु ता शिरपूर जि धुळे

Views: 406
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुखमंगेश चिवटेंचा “डिजिटल मिडिया”कडून सत्कार ! सोलापूर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुखमंगेश चिवटेंचा "डिजिटल मिडिया"कडून सत्कार ! सोलापूर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)