तऱ्हाडी येथे हर घर झेंडा, हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा
तऱ्हाडी:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर झेंडा ,सर घर तिरंगा हा उपक्रम तऱ्हाडी गावात राबवण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा झाली अध्यक्ष स्थानी लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर होते. गावात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर झेंडा हर घर तिरंगा.
हा उपक्रम राबविण्यात येणार आहे हर घर झेंडा हर घर तिरंगा यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्राम विकास अधिकारी अविनाश बैसाणे यांनी केले यावेळी स्व.अण्णासाहेब सा.सो. पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी .जिल्हा परिषद मराठी शाळा तऱ्हाडी. विठ्ठल धनगर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभाणपूर. संजय जाधव पिक संरक्षण सेवा सहकारी सोसायटी. विजय सोनवणे. राम मंदिर ट्रस्ट . आरोग्य उपकेंद्र तऱ्हाडी येथील कर्मचारी व ग्रामपंचायत तऱ्हाडी यांनी तऱ्हाडी.ममाणे व अभाणपूर येथील तीनही गावातील तेराशे साठ कुटुंब असून या कुटुंबांना झेंडा पुरवण्यासाठी मदत जाहीर केली.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम भामरे. उपाध्यक्ष युवराज भलकार.पिक संरक्षण सोसायटीचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम. मल्हार सेनेचे उपाध्यक्ष सुनील धनगर. जि. प.शाळेचे मुख्याध्यापक गणेश पवार . ज्ञानेश्वर पाटील. संजय जाधव. युवराज जाधव. विलास भामरे. प्रविण शिंदे. परिचारिका दिपाली बडगुजर. आरोग्य अधिकारी डॉ. धनश्री चौधरी अंगणवाडी सेविका. मदतनीस .आशा वर्कर. ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी अविनाश बैसाणे यांनी तर आभार रावसाहेब चव्हाण यांनी मानले







