धुमाळवाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
दहिवडी प्रतिनिधी
: पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न श्रीमंत शिवाजी राजे उद्यान विद्या महाविद्यालय फलटण येथील उद्यान कन्यांनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला .यावेळी मा. कृषी अधिकारी अरविंद नाळे आणि कृषी सहाय्यक सचिन जाधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच फलटणमधील सुप्रसिद्ध हॉटेल जॅक्सन इनिसचे शाखा प्रमुख पृथ्वीराज निंबाळकर या कार्यक्रमाला उपस्थित होते हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि होतकरू शेतकरी यांचे स्वागत करून करण्यात आला.
मा.कृषी अधिकारी अरविंद नाळे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्या पर्यावरणासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. यानंतर उद्यान कण्या कुमारी जाधव प्रियांका, खरात निकिता, थोरात सोनाली ,माने साक्षी, गार्डी काजल, सजगणे श्रेया यांनी शेतकऱ्यांना आपले मनोगत व्यक्त केले आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली तसेच यावेळी शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात आला .
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच समीर पवार, गावातील सर्व होतकरू शेतकरी शरद शिंदे ,सुनिल भोसले ,अनिल गुंजवटे ,मारुती पवार तुषार धुमाळ यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सागर निंबाळकर प्रा. ए डी पाटील आणि प्रा.जे व्ही लेंभे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.







