कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय अर्थे येथे पालक शिक्षक सहविचार मेळावा संपन्न
त-हाडी
कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय अर्थे येथे आज दि.29/07/2022 रोजी पालक शिक्षक सहविचार मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आण्णासो. आर.बी.महाजन यांनी भूषवले. आणि प्रमुख पाहुणे म्हणून अर्थे बु.चे सरपंच श्री.साहेबराव पाटील व अर्थे खु.चे सरपंच अनिल गुजर हे प्रमुख उपस्थित होते.
प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य.श्री.वाय.एल.पाटील सर यांनी पालकांशी विद्यार्थी उपस्थिती ,विविध शिष्यवृत्ती परीक्षा ,विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात राबवले जाणारे उपक्रम,विविध शासकीय शिष्यवृत्ती इ.अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करून पालकांच्या समस्या समजून घेतल्या.
विद्यार्थ्यांच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.मार्गदर्शन सुनील पाटील सर व अर्थे खु.चे पोलिस पाटील श्री.किशोर पाटील सर यांनी केले.आर.बी.महाजन सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले व त्यानंतर या पालक सभेत शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची पालक-शिक्षक संघ कार्यकारणी समितीची स्थापना करण्यात आली.
आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका ताईसो.पातूरकर मॅडम यांनी केले व मेळाव्याचे सूत्रसंचलन श्री.आर.डी. राजपूत सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.







