घाणंद मध्ये महिलेची आत्महत्या
आटपाडी प्रतिनिधी
घानंद ता. आटपाडी येथील रूपाली सिद्धेश्वर होनमाने हिने आत्महत्या केली असून याबाबत महेश बाळासाहेब केंगार रा. मळोली ता. माळशिरस सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की महादेव होनमाने, आबा होनमाने, रंगुबाई होनमाने, यांनी माझी बहीण रूपाली सिद्धेश्वर होनमाने हिला तिचा दीर महादेव होनमाने, तिचा सासरा आबा होनमाने, व तिची सासू रंगूबाई होनमाणे यांनी घरगुती कारणावरून तसेच चार चाकी, छोटा हत्ती घेण्याकरिता माहेरून पैसे घेऊन ये असे वारंवार म्हणून तिला शिवीगाळ, दमदाटी करून तिला मारहाण करून तिला उपाशी ठेवून जात-हाट करून तिचा मानसिक व शारीरिक व मानसिक दिल्याने व तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने या त्रासाला कंटाळून रूपाली हिने तिचे सासरे आबा होनमाने यांच्या घरात लोखंडी अँगल ला साडी ने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे.
अशी तक्रार महेश बाळासो केंगार यांनी दिली आहे पुढील तपास पो. उ. निरीक्षक गोसावी करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी भेट दिली व घटनेची माहिती घेतली.
तर घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रूपाली हिचा पती सिद्धेश्वर याला दारूचे व्यसन होते. सिद्धेश्वर घरी दारू पिऊन आल्यानंतर वडील, भाऊ व आई त्याला वेडेवाकडे बोलत असे तू दारू का पितोस असे सतत म्हणत असे त्या वेळेला पतीच्या बाजूने पत्नी रूपाली बोलत असे व अनेक वेळा तिने पती दारू पिऊन आल्यानंतर घरामध्ये झालेल्या वादात पतीची बाजू घेत असे , असे अनेक वेळा घडले होते. मागील काही दिवसांमध्ये त्या दोघा पती-पत्नीला विभक्त ठेवण्यात आले होते. अशी घटनास्थळावरून माहिती मिळाली आहे.







