डोंगर गावाचा शासनाच्या स्वामित्व योजनेला विरोध शासनास दिलेले पत्र.
*. _______________________________
डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील_ दि 1ऑगस्ट 2022 रोजी शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे सकाळी 9 वाजता विशेष ग्रामसभा घेण्यात आली शिंदखेडा तालुक्याचे उपआधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे बी एस चित्ते हे अधिकारी या ग्रामसभेत उपस्थित होते यावेळी त्यांनी असे सांगितले की या गावाचा गावठाण जागेचा ड्रोन द्वारे सर्वे करायचा आहे
आणि हि शासनाचीस्वामित्व योजना आहे हा सर्व्हे झाल्यानंतर वसुली मोजमाप आम्ही करू घराचे व जागेचे उतारे आमच्या मार्फत तालुक्याला मिळतील या गोष्टींना ग्रामस्थांचा विरोध आहे
कारण प्रत्येक वेळेस गरीब आणि इतर ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी वसुली भरण्यासाठी व घराचे उतारे घेण्यासाठीजाणे न परवडणारे आहे कारण याच्यात वेळ व पैसा वाया जाणार तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडणार म्हणून वरील अधिकार स्थानिक ग्रामपंचायतीलाच प्रदान करण्यात यावेत यामुळे गावातच नागरिकांना जागेचे उतारे मिळतील व कर वसुली देखील गावातच भरता येईल आणि शासन जर यावरील गोष्टी करत असेल तर त्यास आमच्या ग्रामपंचायतीचा व ग्रामस्थांचा विरोध आहे तसा विरोधाचा ठराव देखील आज तयार करण्यात आला अधिकाऱ्यांना यावेळी तसे पत्र देण्यात आले
यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील मा सरपंच अशोक पाटील उपसरपंच संजय जगन्नाथ पाटील हिंमतराव त्रेंबक पाटील नितीन पाटील हिरालाल भिल गणेश पाटील राहुल पाटील ग्रामसेविका जयश्री पाटील विकासोव्हाईस चेअरमन तुकाराम राजाराम पाटील व ग्रा प सदस्य व ग्रामस्थ इ उपस्थित होते







