टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनजागृती रॕली
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मरा ठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते 4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्व जनतेपर्यंत पोहचवून त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी रॕलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी टेकवाडे गावाचे वि.का.सोसायटी चेअरमन श्री दिलीप धनगर होते
तर प्रमुख अतिथी म्हणून टेकवाडे गावाचे सरपंच श्री सुकदेव वाघ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मोतीलालभाई पटेल,वि.का.सो.मा.चेअरमन श्री विजू आबा चौधरी सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष महाराज, श्री किशोर कोळी,ग्रामपंचायत सदस्य श्री दुर्गेश पटेल,ग्रामपंचायत सदस्या सौ.ज्योतीबाई कांतीलाल पारधी उपस्थितीत होते.मुख्याध्यापक श्री आर.बी.खोंडे यांनी आपल्या प्रास्तविकातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे
महत्व व उद्देश व पूर्ण आठवड्यात शाळेत होणारे कार्यक्रम उपस्थित पालक व मान्यवरांना समजावून सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सर्व मान्यवरांनी भारत माता व राष्ट्रध्वज तिरंगा यांचे पुजन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नारे देत घोषणांनी परिसर दणाणून सोडला.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनजागृती रॕली संपूर्ण टेकवाडे गावात फिरली हर घर तिरंगा हा संदेश विद्यार्थ्यांनी घराघरापर्यत पोहचवला.सदर रॕलीत गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी,ग्रामस्थ,पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.रॕलीचा समारोप संपूर्ण गाव फिरल्यानंतर शाळेत करण्यात आला. सुत्रसंचलन उपशिक्षक श्री संजय पटेल यांनी केले.तर आभार उपशिक्षिका श्रीम. बबिता काटोळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशालेय उपक्रम समिती प्रमुख उपशिक्षिका श्रीमती जे.पी.पाटील, बालवाडी शिक्षिका श्रीमती एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी श्री बी.एल.पावरा,श्री ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.







