स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जनजागृती रॅलीचे टेकवाडे येथे मोठ्या उत्साहात स्वागत..!
त-हाडी
दि.८ ऑगस्ट २०२२ रोजी आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत भव्य जनजागृती रॅली उत्साहात संपन्न झाली. अमृत महोत्सव जनजागृती रॅलीला प्राचार्य श्री.के.आर.जोशी व पर्यवेक्षक श्री.के. बी. चौधरी सर यांनी हिरवा झेंडा दाखवून शाळेतून रॅलीची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण टेकवाडे गावात चौका चौकात देशभक्तांच्या वेश भूषेत, लेझीम नृत्यासह पोस्टर व झेंडे उंचावून देशभक्तीचा जयघोष करत संपूर्ण गावातून सादरीकरण करण्यात आले.
भारत आमुचा प्राण, तिरंगा त्याची शान.माझा देश माझा सन्मान, तिरंगा असे आमुचा अभिमान. अमृत महोत्सव मनाना है, जन-जन मे जागृती लना है| अशा विविध घोषणांनी परिसर दमदुमून गेला होता. या रॅलीसाठी विद्यालातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी होते तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनीं परिश्रम घेतले.







