एच आर पटेल कन्या विद्या. वरूळ् येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न
त-हाडी
एच आर पटेल कन्या माध्य.व उच्च माध्य विद्या वरूळ येथे आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत भव्य देशभक्तीपर नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वरूळ पंचक्रोशीतील प्रतिष्ठित महिला सामाजिक कार्यकर्ते व पालक ज्योती हिलाल मराठे, सोनल चंदु मराठे कविता योगेश ईशी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाकळे अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री एस एन जोशी उपस्थित होते. सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थीनिंनी नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच विविध देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्य सादरीकरण करण्यात आले. स्पर्धा दोन गटात घेण्यात आली पहीला गट ई.5वी ते7 वी त्या मध्ये प्रथम क्रमांक 7 वी देश रंगीला रंगीला या नृत्याला तर द्वितीय क्रमांक 6वी च्या ओ..देश..मेरे.. या नृत्यास तर तृतीय क्रमांक ई.5वी..इंडीया वाले या नृत्यास मिळाला मोठ्या गटात प्रथम क्रमांक ई 8वी च्या ये देश है विरजवानो का..या नृत्यास तर द्वितीय क्रमांक ई 9वी च्या संदेसे आते हैं व ई 12वी च्या जय हो..या नृत्यास विभागुन देण्यात आला तर तृतीय क्रमांक ई 12 वी च्या देश रंगीला रंगीला…या नृत्यास मिळाला सर्व विद्यार्थीनिंनी स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला .
यास्पर्धेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.







