आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे अमृत महोत्सव रॅली संपन्न
त-हाडी दि.१०- येथील आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त गावातून रॅली काढण्यात आली व जनजागृती करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याकारणाने शासकीय आदेशानुसार गावपाड्या, वस्तीवर याबाबत जनजागृती व्हावी व लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने ८ ते १५ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. त्या अंतर्गत कळमसरे ग्रामपंचायत व आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ रोजी,स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमीत्त रॅली,दि.९ ला,क्रांतिकारकांच्या वेशभूषा सादरीकरण विद्यार्थी स्पर्धा घेण्यात आली. दि.१० ला देशभक्तीपर नृत्य, रिमिक्स,यातून देशभक्ती व विविधतेतून एकता हा संदेश देण्यात आला.याप्रसंगी कळमसरे गावात दिनांक ८ रोजी रॅली काढून जागृती करण्यात आली. व इतर स्पर्धा या शालेय स्तरावर घेण्यात आल्या.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत कळमसरे च्या सरपंच मा.सखुबाई मच्छिंद्र भील, उपसरपंच मा.रवींद्र सिंग राजपूत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष,मा.सुदाम तुकाराम मराठे, ग्रामसेविका ,श्रीमती.विद्या सुरेश सोनवणे,कृषी अधिकारी, श्री. एस. आर .पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. वाय. व्ही. पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, राजधर कौतिक पाटील,ग्रामस्थ बापू झुलाल माळी,महेश संतोष निकम, मधुकर दयाराम निकम,अविनाश शांतीलाल माळी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक ,श्री.एस. एच .जाधव, श्री.आर.जे.सोनवणे. श्री.नामदेव साळुंखे,श्री.ए.डी.महाजन,श्री.वाय.पी. माळी,श्री.एम.एस.वाडीले,श्री.व्ही.ए. मोरे,श्री.मिलिंद सोनगडे,श्री.आर. एस.माळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती .ज्योती निकवाडे व सौ.वैशाली सोनवणे यांनी केले. कार्यक्रमांना गावातील नागरिकांसह पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.







