टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर रांगोळी स्पर्धा
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मरा ठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सर्व जनतेपर्यंत पोहचवून त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी रांगोळी स्पर्धेचे तसेच विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक रक्षाबंधन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी शालेय व्यवस्थापन समिती सदस्या रूपाली सोनार, तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती सदस्या रूपाली धनगर,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा मनिषा भोई,सदस्या वैशाली सोनार, अरूणा शिरसाठ,आशा भील उपस्थित होते.मुख्याध्यापक आर.बी.खोंडे यांनी आपल्या प्रास्तविकातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे
महत्व व उद्देश व पूर्ण आठवड्यात शाळेत होणारे कार्यक्रम तसेच रांगोळी स्पर्धा याबाबत उपस्थित पालक व मान्यवरांना माहिती दिली
त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सर्व मान्यवरांनी भारत माता यांच्या प्रतिमेचे पुजन केले त्यानंतर उपस्थितीत माता पालक यांनी देशभक्तीपर संदेश देणाऱ्या सुरेख रांगोळ्या काढून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली या रांगोळी स्पर्धेत मान्यवरांनी सुध्दा सहभाग नोंवला या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक सुधाकर वळवी सर, उपशिक्षक रोहिदास गोपाळ सर यांनी केले त्यात प्रथम क्रमांक वैशाली कैलास सोनार,व्दितीय मनिषा बापू भोई,तृतीय मिना भरत भोई,उत्तेजनार्थ रूपाली पंकज सोनार,सोनल महेश वाडीले या सर्व यशस्वी स्पर्धकांना शाळेकडून बक्षीस देवून देवून सन्मानित करण्यात येणार आहे.सदर स्पर्धेत अनेक माता पालकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेत चुरस वाढवली होती.
माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुत्रसंचलन उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले.तर आभार उपशिक्षक अनिल माळी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षिका बबिता काटोळे उपशिक्षक संजय पटेल सहशालेय उपक्रम समिती प्रमुख उपशिक्षिका जे.पी.पाटील, बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा,ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.







