अहिल्यापूर विद्यालयात अमृत महोत्सव निमित्ताने देशभक्तीपर रांगोळी स्पर्धा
थाळनेर प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन विद्यालयाचे पी.एन.गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने देशभक्तीपर विविध सुंदर रांगोळ्या रेखाटल्या.
त्यात क्रांतिकारक , जवान, तिरंगा, भारतमाता, स्वातंत्र्य भारत दाखविणारी कल्पना, मोरपंखी तिरंगा, भारतीय सांस्कृतिक वारसा, आधुनिक भारत, सर्व धर्म समभाव असे विविध विषय रांगोळीतून काढले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्तीपर स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गट इयत्ता आठवी ते दहावी गट आणि पालकांच्या गट स्वतंत्रपणे करण्यात आला होता. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण एस.पी.महाजन ,डी.व्ही. जावरे यांनी केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन. गोसावी, पालक शिक्षक संघाच्या सुवर्णा गिरासे यांनी रांगोळी स्पर्धा दालनाचे उद्घाटन केले.रांगोळी स्पर्धेचे संयोजन विभाग प्रमुख टी. यु. कुरेशी यांनी केले. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख एस. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे यशस्वीतेसाठी व्ही.डी.कढरे, व्ही. बी. चौधरी ,आर. एम. जाधव, बी. ओ. वाघ, भाईदास कुंभार, राजू धनगर ,भूवसिंग पावरा,वसंत थोरात, किरण देशमुख
यांनी प्रयत्न केले.







