तऱ्हाडी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवा याची उद्घाटन प्रसंगी सरपंच जयश्री धनगर यांचे आवाहन
तऱ्हाडी:
-तऱ्हाडीसह. अभानपुर. मामाने. या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत या गावातील प्रत्येक घरावर झेंडा लावण्याचे काम प्रशासनाची प्रगती पथावर तयारी सुरू केली आहे या अभियाना अंतर्गत स्थानिक पुढारी. अधिकारी व शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने घरोघरी तिरंगा लावण्याचा काम करावे असे आवाहन सरपंच जयश्री धनगर यांनी केले
शुक्रवारी ग्रामपंचायत व स्व.आणासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर झेंडा हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत गावातील 1360 घरांना झेंडा वाटप करून तो प्रत्येक घरावर लावण्यात येईल असे प्रतिपादन सरपंच जयश्री धनगर यांनी गावात रॅली चे उद्घाटन करताना सांगितले ग्रामपंचायत कार्यालयात गावातील 50 ज्येष्ठ नागरिक. आदर्श तलाठी आदर्श कोतवाल आदर्श व्यापारी व माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी उपसरपंच उजनबाई अहिरे. ग्राम विकास अधिकारी. अविनाश बैसाणे. तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम भामरे धनगर मल्हार सेनेचे उपाध्यक्ष सुनील धनगर तापी परिसर विद्या.प्रसारक संस्थेचे अध्यक्ष. सुभाष भामरे. मुख्याध्यापक एन. एच .कश्यप .विलास भामरे. माजी उपसरपंच गणेश भामरे . चेअरमन अरुण कदम. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक रावसाहेब चव्हाण व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी अविनाश बैसाणे यांनी केले







