महा एन.जी.ओ फेडरेशन यांच्या सहकार्याने
व सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने पुण्यातील पॅरा प्लेजिक रिहॅबिटेशन सेंटर मध्ये सैनिकांना बीजराखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.
पुणे ;
या सेंटर मध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधील सैनिक असतात जे सैनिक देशसेवा करीत असताना त्यांना अपंगत्व येते, किंवा देशा साठी लढताना अपंगत्व येते अशा सैनिकां साठी पुण्यात खडकी येथे त्यांच्यावर मेडिकल उपचार केले जातात.अशा सैनिकां साठी संस्थेच्या महिलांनी बीजराखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.
संस्थेच्या अध्यक्षा उज्वला गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देऊन,बीजराखी चे महत्व सांगितले.ही राखी वेगवेगळ्या बियांपासून तयार केली आहे.ही राखी कुंडीत रूजवली असता त्या पासून रोप तयार होते.अशी पर्यावरण पुरक राखी आहे.इ माहिती दिली.
संस्थेच्या उज्वला गायकवाड,प्रजावती गायकवाड, कविता घाडगे.सुवर्णा सोनार.व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.तसेच सेंटर चे वैद्यकीय संचालक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.







