टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर रंगभरण स्पर्धा
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सर्व जनतेपर्यंत पोहचवून त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी देशभक्ती या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी मुख्याध्यापक आर.बी.खोंडे होते.त्यांनी आपल्या प्रास्तविकातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे
महत्व व उद्देश व पूर्ण आठवड्यात शाळेत होणारे कार्यक्रम तसेच रंगभरण स्पर्धा याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली त्यानंतर भारत माता यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थितीत विद्यार्थ्यांनी दिलेल्या चित्रात रंग भरून चित्रे सुंदर रंगवण्याचा प्रयत्न केला.शाळेतील इंग्रजी शिक्षक अनिल माळी व उपशिक्षक संजय पटेल यांनी परीक्षण करून प्रत्येक वर्गातून पाच क्रमांक काढले ते पुढीलप्रमाणे इयत्ता 1 ली प्रथम-कोळी मृणाल विजय व्दितीय-वाघ श्रावणी यतीन तृतीय – राजपूत वेदिका योगेंद्र,भोई मिताली बापू उत्तेजनार्थ-धनगर खुशल पंकज इयत्ता 2 री-प्रथम-धनगर मिताली ज्ञानेश्वर,व्दितीय-पावरा अमिता दिनेश,तृतीय-कोळी हर्षदा अशोक,धनगर कनिष्का युवराज,उत्तेजनार्थ -वाडीले प्रिया हिरालाल इयत्ता 3 री प्रथम- ईशी पलक दिपक,व्दितीय-वाडीले मयूरी कांतीलाल,तृतीय-वाडीले दिशा भरत,धनगर हितेश्वरी भैय्या,उत्तेजनार्थ – कोळी चैताली भरत इयत्ता 4थी प्रथम -कोळी नेहा निंबा,व्दितीय -कोळी प्रांजल किशोर,पटेल तन्वी महेंद्र तृतीय -राजपूत रूद्र भरतसिंग उत्तेजनार्थ – शिरसाठ मयूर दादाभाई या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले.तर आभार उपशिक्षक अनिल माळी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षिका बबिता काटोळे उपशिक्षक संजय पटेल सहशालेय उपक्रम समिती प्रमुख उपशिक्षिका जे.पी.पाटील, बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा,ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.







