शिंदखेडा तालुक्यातून तोतया पत्रकारांचा सुळसुळाट रेशनदुकान तपासणी ची धमकी देऊन पैशांची लूट कारवाईची मागणी. ,,,
,____________
शिंदखेडा तालुक्यात गेल्या एका महिनाभरापासून ग्रामीण भागात व परिसरात दररोज एक ना दोनतोडीपणी तक्रारी उद्भवत आहेत या तालुक्यात तोतया पत्रकारांचे एक टो डके सक्रिय झाले असून दररोज 2ते4 दुकानांवर जाऊन दुकानाचे दप्तर तपासणी साठी मागणी करत असून माहिती मागत आहेत व माहिती चुकीची आहे असे सांगून आपल्यावर कारवाई करण्यात येईल व आम्ही पेपरला छापू तक्रार छापू द्यायची नसेल तर पंचवीस हजार रुपये द्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने तोडी पानीची मागणी होत आहे
या प्रकाराला शिंदखेडा तालुक्यातील धान्य दुकानदार त्रस्त झाले मागील आठवड्यात त्यांना पकडून पोलीस स्टेशनला टाकण्याचा प्रयत्न झाला पण ते पळून गेलेत म्हणून आता शासनाने व पोलीस विभागाने तातडीने या गंभीर घटनेची दखल घ्यावी व या तालुक्यात रेशन दुकानदारांना त्रास देणार्या तोतया पत्रकारांचा बंदोबस्त करून कठोर शिक्षा करावी अशी शिंदखेडा तालुक्यातील बहुतेक रेशन दुकानदारांनी मागणी केलेली आहे







