बभळाज येथील पटेल विद्यालयात सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न
शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय बभळाज येथे आज दि. 14/08/2022 वार रविवार रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आजी-माजी सैनिकांचा सन्मान व सत्काराचा कार्यक्रम आणि क्रांतीकारकांची यशोगाथा – वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. ए. कुरेशी होते तर प्रमुख पाहुणे आणि सत्कारमूर्ती म्हणून आजी – माजी सैनिक श्री. कोमल सुनील करंकाळ (अजनाड बंगला), श्री. मंगल पंडीत पाटील (तोंदे) श्री. गोकूळ देवचंद शिरसाठ, श्री. रंगराव थावरू जाधव (बभळाज) आणि श्री. भुषण भिमराव पाटील (हिसाळे), सौ. सपना मराठे आणि पोलीस पाटील श्री. नितीन जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
उपस्थित सर्व आजी-माजी सैनिकांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. ए. कुरेशी यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
क्रांतीकारकांची यशोगाथा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत एकूण 37 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री पाटील, द्वितीय क्रमांक वर्षा सोनवणे तृतीय क्रमांक हिरल पाटील आणि उत्तेजनार्थ बक्षीस मयुरी बंजारा हीने पटकाविले.
परीक्षक म्हणून श्री. एस. एस. वानखेडे आणि डी. सी. बडगुजर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर. पी. जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. रंजन नामगे यांनी मानले.
कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. ए. कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री. आर यु. चौधरी, श्री. आर. ए. माळी, श्री. पी. एस. पाटील, , किशोर पाटील, आनंद बेलगमवार, , श्री. आर. टी. पाटील, , श्री. एस. जी. वळवी, योगेश पाटील, श्री. सचिन शिरसाठ, श्री. एस. के. पावरा, शरद पवार, भरत महाजन, यांनी परिश्रम घेतले.







