टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माजी सैनिक सन्मान सोहळा संपन्न.
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम निमित्ताने माजी सैनिक श्रावण गजमल शिरसाठ व दयानंद बाबुराव शिरसाठ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सरपंच,उपसरपंच,वि.का.सोसायटी चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थाचे पदाधिकारी,पालक बंधु भगिनीउपस्थित होते.
प्राथमिक व माध्यमिक,उच्च माध्यमिक च्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर संकुलातील प्राथमिक शिक्षकांनी आपल्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या विविध माजी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी क्रांतीवीरांचा जीवनपट व यशोगाथा असलेल्या आॕडीओ क्लीप ऐकवण्यात आल्या.
त्यानंतर विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य सेनानी या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी मराठी,इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर करून केलेली भाषणे ऐकून मान्यवर प्रभावित झाले.परीक्षण ज्येष्ठ उपशिक्षक जे.पी.पटेल व उपशिक्षिका बबिता काटोळे यांनी केले.मुख्याध्यापक रविंद्र खोंडे व प्राचार्य किशोर जोशी यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन प्रा.एस.एम.पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







