जळोद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
त-हाडी आज दिनांक १४/०८/२०२२ रविवार रोजी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा जळोद ता. शिरपूर जि.धुळे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला ध्वजारोहण NSG – Balgam , 269 मराठा बटालियन, इंजिनीयर फोर्स, मातोश्री कॉलनी, शिरपूर गावाचे सुपूत्र माजी सैनिक मा. श्री मनोहर धनराज पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. माजी सैनिक यांच्या आगमनामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना खूप आनंद झाला अशा या आनंदमय वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला
कार्यक्रमात नंतर मा. मनोहर धनराज पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या शैक्षणिक काळापासून ते आज नोकरीत असलेल्या कालावधीतील जिवनपटावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जिद्द ,चिकाटी व शिस्त कशी राखावी याविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतिने सत्कार करण्यात आला. तसेच आमच्या शाळेतील आनंदित झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी सुद्धा आलेले मान्यवर माजी सैनिक श्री मनोहर धनराज पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला ध्वजारोहणाचा कार्यक्रमास हजर राहिल्याबद्दल प्राथमिक मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी मान्यवरांचे आभार मानले
समारंभा प्रसंगी शाळेतील आश्रम शाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







