भोरखेडा आर.सी.पटेल विद्यालयातर सैनिक सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न
त-हाडी
आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने परिसरातील आजी माजी सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोरखेडा येथील ज्येष्ठ नागरिक श्री. रघुनाथ भिलेसिंग जमादार हे होते,
सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित असलेले आजी व माजी सैनिक तोंदे येथील सर्व श्री. मंगल पंडित पाटील अजनाडचे फौजी सुपुत्र अविनाश पाटील त्यांच्या धर्मपत्नी सिमाताई पाटील, भाटपुऱ्याचे सुपुत्र निलेश पाटील, भोरखेड्याचे सुपुत्र गणवीर जमादार व तरडी येथील BSF मध्ये कार्यरत असणाऱ्या दिपमाला मच्छिंद्र पाटील यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाखेचे प्राचार्य आर.एफ.शिरसाठ, कल्याण हुलेसिंग राजपूत,प्रवीण एकनाथ राजपूत, पर्यवेक्षक पी.व्ही.पाटील यांची उपस्थिती होती.
सैनिक सत्काराआधी माजी सैनिक निलेश पाटील व गणवीर जमादार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.उपस्थित आजी-माजी सैनिकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तद्नंतर वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. इयत्ता पाचवी ते बारावी च्या एकूण 28 विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवला. क्रांतिकारकांची यशोगाथा या विषयावर तीन गटात ही स्पर्धा संपन्न झाली. लहान गटात प्रथम धनगर आयुश्री ईश्वर,द्वितीय चौधरी हर्षदा महेंद्रसिंग, तृतीय क्रमांक विभागून राठोड पुनम जगदीश व धनगर विवेक दिनेश यांना देण्यात आले.
तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक जाधव नारायण रतिलाल, द्वितीय क्रमांक शिरसाठ दिपाली कैलास व तृतीय क्रमांक राजपूत प्रतीक दिनेश यांनी पटकावले. तर उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मीनाक्षी अर्जुन जाधव द्वितीय क्रमांक भारती पंडित देवरे व तृतीय क्रमांक नगीना गोकुळ मोरे या विद्यार्थिनींनी मिळवले परीक्षक म्हणून सर्वश्री व्ही.डी. पाटील,जे.डी.पाटील,डी.आर राजपूत,एस. एम.पाटील,व्ही.बी.शर्मा श्रीमती एम.टी. पटेल यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस.एस.कार्यक्रम अधिकारी श्री.एन.वाय.बोरसे व व्ही.एस.इशी यांनी केले तर आर.जी.पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन.डी.चव्हाण, तुषार पाटील, चंदन पावरा,जे.डी.पाटील, मीना पटेल मॅडम,दिपाली निकम मॅडम,काजल राजपूत यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले







