स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे निमित्त शिरपूर शहरात हर घर तिरंग्याचा जयघोष
सकल तारण श्री तरणदिगंबर जैन समाजातर्फे जागो तयजागी देशभक्ती चा मोहोल ‘ हर घर तिरंगा … हर जगह तिरंगा समाजाच्या रॅलीतून संदेश
शिरपूर : रविवारी शिरपूर शहरातील सकल श्री तारण तरण दिगंबर जैन समाजाच्या वतीने श्री तारण तरण जैन मंदीरापासून रॅलीस प्रारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन जनतेला केले आहे त्याचाच एक भाग म्हणून शहरातील श्री तारण तरण दिगंबर जैन समाजाने लहान मुलं ,, तारण नवयुवक मंडल , महिला मंडल, बालक ,बालिका मंडळाने हातात तिरंगा ध्वज घेत भारत माता की जय जय कार करीत रॅलीत सहभागी झालेत
सकाळी साडे आठ वाजता श्री तारण तरण जैन मंदिरात दिगंबर जैन समाजाच्या उपस्थित धार्मिक विधी करत श्री तारण स्वामींच्या प्रतिमेची पुजन करून ढोल ताशा च्या निनादात आणि घोषणांनी रॅलीला सुरुवात झाली भारत माता की जय, वंदे मातरम् , स्वतंत्र भारताचा विजय असो अशा नाना तऱ्हेच्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते दरम्यान रॅलीतून समाजबांधवांनी घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन केले
शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीचा समारोप राष्ट्रगीता ने श्री तारण तरण जैन मंदिरात झाला याप्रसंगी श्री तारण तरण दिगंबर जैन समाजाचे संघपती किशोर जैन ,युवा अध्यक्ष राजेंद्र जैन , मोतीलाल जैन , ओंकारदास जैन , चंपालाल जैन , डॉ.प्रकाश जैन , अशोक जैन , लालचंद जैन , नारायण जैन , विजय जैन , अमर जैन , किरण जैन , चंद्रशेखर जैन , डॉ.अतुल जैन व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या







