आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व बक्षीस वितरण सोहळा संपन्न
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त भोरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच दीपक गुलचंद भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच प्रशांत शिवाजी जमादार, रघुनाथ भिलेसिंग जमादार, नथूसिंग बंडूसिंग जमादार, भूपेंद्र चंद्रसिंग राजपूत, दरबार प्रतापसिंग जाधव,प्रमिलाबाई राजपूत,भरतसिंग लोटनसिंग जमादार, कल्याण हुलेसिंग जमादार, जितेंद्र मच्छिंद्र राजपूत, प्रल्हादसिंग भगवानसिंग राजपूत, आत्माराम बाबुराव मोरे, कैलास मोरे, सचिन सत्तरसिंग राजपूत, विजयसिंह रोहिदास राजपूत, प्रवीण एकनाथ राजपूत, चेतन शामसिंग राजपूत तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर एफ शिरसाठ, पर्यवेक्षक पी व्ही पाटील, मुख्याध्यापक ईश्वर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त व ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांना आदरणीय संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार अमरीशभाई पटेल व उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी यांच्याकडून रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली, क्रीडा क्षेत्रातील यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी आदरणीय प्राचार्य आर एफ शिरसाट व पर्यवेक्षक पी व्ही पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले







