संत सेना महाराज यांची पुण्यतिथी घरोघरी उत्साहात मनोभावे साजरी करावी- महेंद्र खोंडे
त-हाडी ( प्रतिनिधी ) दि २१
:-समस्त नाभिक समाज बांधवांचा व्यवसाय सेवाभावी कार्य आहे आणि व्यक्तीनिष्ठ असून सर्व जातीय धर्मासह सर्व जनतेची सेवा हा समाज करतो. राष्ट्रीय धार्मिक सामाजिक शुभ मंगल कार्यात नेहमी अग्रेसर असतो .अशा या कार्यामुळेच संत सेना महाराजाला विक्रम राजांच्या दरबारी गुरुपद स्थान मिळाले होते .
संत सेना महाराज यांची पुण्यतिथी समाज बांधवानी घरोघरी उत्साहात मनोभावे साजरी करावी असे आवाहान महाराष्ट्र राज्य नाभिक सेना संघटनेचे महाराष्ट्र संर्पक प्रमुख महेंद्र खोंडे यांनी केले आहे .
राजे छत्रपती शिवराय यांचे अंगरक्षक म्हणून शुर विर जीवाजी महाले यांची नियुक्ती करण्यात आली होती . होता जीवा म्हणून वाचला शिवा मा जिजाऊंचे उदगार आजही अजरामर झालेले आहे .शिवरायांसाठी आत्मबलिदान करणारे शिवा काशिद यांचा पन्हाळा गडावर पुतळा स्वाभिमानाने उभा आहे स्वतंत्र योद्धा विरभाई कोतवाल शहीद झाले १९९७ ला भारतरत्न पुरस्काराने सन्माननीय झालेले माजी पंतप्रधान गुंलजारी लाल नंदा बिहारचे मुख्यमंत्री करपुरिसिह ठाकूर साधवी ऋतुंबभरा देवी संत सखु माता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष शंकरराव जगताप कीर्तनकार बाबा सातारकर , भन्ते आनंद उपाली हे भगवान गौतम बुद्धाचे पट्ट शिष्य होते .
अनेक नाभिक महापुरुषांनी इतिहास घडविला आहे . यासाठी जगा समोर तथा भावी पिढीला आपला धर्म आपला इतिहास समजून घेण्याकरता व महान संताचा इतिहास आपल्या भावी पिढीला कळत राहावा यासाठी महान पुरुषांच्या पुण्यतिथी , जयंती साजरी व्हायला पाहिजे . जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज प्रगती करू शकत नाही तेव्हा श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी आपापल्या घरीच उत्सवात साजरी करावी . असे आवाहान महाराष्ट्र राज्य नाभिक सेना संघटनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख व न्युज सलुन पार्लर असोसिएशन ऑफ इंडिया सोशल मीडिया प्रमुख- महेंद्र खोंडे यांनी केले आहे.







