नाही भाव अंगी,भूषण मिरवितो जगी !
त-हाडी -महेंद्र खोंडे
कोळशासी अग्नी वर्ण झाला शुभ्र l
अज्ञानाचे अश्रू निवळी गा ll
सेना म्हणे ऐसा लाभ आला हाती l
सुखे नाम चित्ती गाईन गा ll
आज अखंड भारत म्हणजे थोर विचारवंत ,शास्त्रज्ञ कला,क्रिडा, साहीत्यिक,थोर महात्मे,साधू संत यांची ही पावनभूमी विविधतेने नटलेली ही भारतमाता .याच भारतातील मध्यप्रदेश राज्यातील बांधवगड येथील नाभिक समाजाचे देवीदास व प्रेमकुँवरबाई .यांच्या उदरी शके १२२३ वैशाख वद्य १२ इ.स.१३०१ रविवारी संत अवतार संत शिरोमनी श्री .संत सेना महाराजांचा जन्म झाला आणि हेच सेनाजी पुढे संबंध मानवतेचे कुलदैवत झाले,त्यांची आज पुण्यतिथी.
नाही भाव अंगी l भूषण मिरवितो जगी
स्थिर नाही मन l सदा कुविषयाचे ध्यान
सेना म्हणे अपराधी l सांभाळावे कृपानिधी ll
सेनाजींचे वय जसजसे वाढत गेले तसतसे ते समाज प्रबोधन करत गेले .समाजसेवा,राष्ट्रसेवा,अंभग,किर्तन ते करीत असत, हे कार्य करीत असतांना त्यांनी कधीच आपला व्यवसाय सोडला नाही .
लोकांचे केस कापत असतांना ते स्वच्छता ,समता व बंधुत्वता आणि एकतेसाठी प्रबोधन द्यायचे.लोकांचे ते अंतरअंगच नव्हे तर बाह्यअंग देखिल निर्मळ करीत असत.माणवालाच देव माना .माणसाला माणूस जोडा,संघटीत रहा.असा संदेश त्यांनी अवघ्या विश्वाला दिलेला आहे.असे कार्य करीत असतांना बांधवगडचा राजा वीरसिंग यांचे केस कापण्याचे काम सेनाजी करीत होते.एके दिवस आपल्या कामाचा भार अधिक वाढत गेल्याने ते राजाचे केस कापण्यासाठी वेळेवर हजर होऊ शकत नव्हते.तेव्हा राजाचे काम वेळेवर होत नसल्याने राजाचा चेहरा रागाने लालबुंध झाला होता .व तो रागाने सेनाची वाट बघत राजवाड्यात चकरा मारत होता.तेव्हा राजाचे रागावलेले मुख पांडूरंगाच्या निदर्शनास आले आणि मग साक्षात पांडूरंगानेच सेनाजींचे रुप धारण केले आणि राजा वीरसिंहाची मनोभावे सेवा केली .
रागाने तापलेल्या राजाची ‘न भूतो न भविष्यते’ अशी सेवा आज पांडूरंगाच्या हाताने झाली होती .स्वच्छ मऊ हाताने दाढी कटींग झालेला राजाला आनंदीआनंद झाला होता.आणि पांडूरंग तेथून त्यांची सेवा करून निघुन गेले आणि मग आपले काम आटोपून लगबगीने सेनाजी तेथे आले व राजाला कटींग,दाढीसाठी आवाज देऊ लागले.
बघतो तर काय राजा चकाचक झालेला दिसला .सेनाजींना मात्र हा काय प्रकार घडलेला आहे हे समजेना असं झालं होत.तेव्हा राजाच म्हणाला ‘अरे सेनाजी तू तर आत्ताच माझे केस कापून गेला ना !
परत कशाला आलास आणि बघ तु आज केलेल्या माझ्या सेवेने माझी आयुष्यभराची मरगळ दुर झालेली आहे,हे घे दक्षना…’आणि राजाने आपल्या ओंजळीतील हिरे ,मोहरा सेनाजींना दिले.आणि मग सेनाजींना उमज आली की,पांडूरंग आपल्याला प्रसन्न झाला आहे.खरोखरच पांडूरंगाने राजाची सेवा केलेली आहे.
सेना सांगूनिया जातो वैंकुठासी ,
तिथी ते द्वादशी श्रावणमास.
नंतर वद्य १२ शके १९९२ इ.स.१३७०रोजी मध्यप्रदेशातील बांधवगड येथे समाधी घेतली यानंतर राजा वीरसिंहाने संत सेना महाराजांचे समाधी मंदीर बांधले .आम्हा सर्वाचे कुलदैवत संत शिरोमणी संत सेना महाराज यांची आज पुण्यतीथी त्या निमित्ताने त्यांचे जिवन कार्याची महती सांगणारा हा लेख ..संत सेना महारांजी पुण्यतिथी अख्ख्या विश्वाने साजरी करावी एवढी एकच इच्छा.जय संत सेना….
महेंद्र खोंडे
त-हाडी ता शिरपूर.जि. धुळे







