“हे राष्ट्र देवतांचे”
डॉ सौ अनघा राजवाडे
श्री. संजय मरळ
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ माजी सैनिकांचा सन्मान सोहळा !🌹
भव्य, बहारदार, शिस्तबद्ध, चैतन्यदायी, उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला समारंभ
स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त खऱ्या अर्थाने कार्यक्षम व जनतेचे सेवक, लोकप्रिय मा. शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ व मा. नगरसेविका, विरोधी पक्षनेत्या सौ दीपाली ताई प्रदीप धुमाळ यांच्या माध्यमातून ७५ माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. Rupali Chakankar ताई यांच्या हस्ते ध्वजारोहण करून माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
प्रसंगी सुप्रसिध्द गायिका डॉ. अनघा राजवाडे व संजय मरळ यांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील विविध मान्यवर नागरिक उपस्थित होते.







