टेकवाडे प्राथमिक शाळेत बैल पोळा सण साजरा
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी टेकवाडे गावाचे सरपंच सुकदेव वाघ होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून टेकवाडे गावाचे माजी उपसरपंच सदाशिव भाऊ वाडीले,मन्साराम वाडीले,मुकेश भोई,बापू ढोले,बैलांचे मालक भाऊसाहेब ,शालेय व्यवस्थापन समिती महिला सदस्या शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.खोंडे उपस्थित होते.
शाळेतील स्री शिक्षिका व इयत्ता ४ थी मधील सर्व विद्यार्थीनी यांनी बैलांचे औक्षण व पुजन केले. तदनंतर त्यांच्यासाठी तयार केलेला नैवेद्य म्हणजे पुरणपोळी व दिवे आणि गहू त्यांना खाऊ घातले.त्यानंतर शाळेतील उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी पोळा सणाची सुरूवात कशी झाली याची कथा पुराणाताले उदाहरणे देवून विद्यार्थ्यांना समजावली तसेच सध्या पोळा कसा साजरा केला जातो
याविषयी माहिती देवून आपण जगाचा पोशिंदा शेतकरी राजा व बैल या प्राण्यासंदर्भात कायम कृतज्ञ राहिले पाहिजे असे आपल्या मनोगतातून सांगितले सुत्रसंचलन इंग्रजी शिक्षक अनिल माळी यांनी केले.तर आभार उपशिक्षिका बबिता काटोळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय पटेल बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा, ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.







