शिक्षक ऑनलाइन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील अनियमितता असलेबाबत ,व चालू बदली प्रक्रियेतील शिक्षकांना कार्यमुक्त करू नये
शिक्षकांची मागणी
नातेपुते (श्रीकांत बाविस्कर):
ग्रामविकास विभागाच्या Vinsis या पुणेस्थित एका कंपनीच्या माध्यमातून राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पडली .तथापि या बदली प्रक्रियेत खूप मोठया प्रमाणात अनियमितता झालेली दिसून येते.बहुतेक सर्वच जिल्हा परिषदांनी चुकीची बिंदूनामावली पोर्टलवर अपलोड केली आहे.अनेक ठिकाणी सेवाज्येष्ठता डावलून केवळ पसंतीक्रमाने बदल्या झाल्या आहेत.
अनेक शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात तब्बल 18 ते 20/22 वर्षे सेवा केलेले आहेत.त्यांचा या बदली प्रक्रियेत अजिबात विचार झालेला नाही.यासारख्या असंख्य त्रुटी या बदलीप्रक्रियेत असून या संदर्भात मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत . या बदली प्रक्रियेतील अनियमिततेसंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांकडे हजारोंच्या संख्येने तक्रारी दाखल झाले आहेत
.अनेक शिक्षक उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या विचारात आहेत . त्यामुळे गेल्या तीन चार वर्षापासून बहुप्रतिक्षित असलेल्या बदल्या या सर्वंकष , परिपूर्ण व न्याय पद्धतीने झालेल्या नाहीत. 7 एप्रिल 2021 च्या जी आर नुसार सेवाजेष्ठता गृहीत धरून बदल्या होतील असे सांगण्यात आले होते.
परंतु प्रत्यक्षात तसे न करता सेम पर्याय व सेम संवर्गात ज्युनिअर शिक्षकांच्या बदल्या केल्या.त्यामुळे सिनिअर शिक्षकावर खूप मोठा अन्याय झाला आहे. झालेल्या सर्व बदल्यांना स्थगिती देऊन बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न करता आणखी दोन चार महिन्यांच्या अवधीनंतर सर्व जिल्हा परिषदेतील आजपर्यत सेवानिवृत्त झालेल्या जागा जमेस धरून ,केंद्रप्रमुख ,पदवीधर पदोन्नती करून रिक्त झालेल्या उपशिक्षकांच्या जागा बिंदूनामाववलीत अचूक व पारदर्शकपणे दर्शवून सर्व जिल्ह्यांची अचूक व परिपूर्ण बिंदूनामावली तयार करण्यात यावी त्यानंतर ही प्रक्रिया राबवावी.
त्यामुळे झालेल्या बदल्यातील शिक्षकांना कार्य मुक्त न करता सध्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावेअशी मागणी उपसचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे करण्यात आली आहे







