भाटपुरा विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव
भाटपुरा शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील तानाजी दौलतराव पाटील विद्यालय येथे विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक मधुकर यशवंत पाटील यांची ४१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक पितांबर दौलतराव देवरे होते.
भाटपुरा येथील तानाजी दौलतराव पाटील माध्यमिक विद्यालयात प्रथम मुख्याध्यापक मधुकर यशवंत पाटील यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरा करण्यात येयेते. पाटील यांनी या शाळेच्या स्थापनेसाठी मोठी मेहनत घेतलेली होती.
कै. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यालयातील इयत्ता दहावीत क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येतो. दरवर्षी यासाठी निवृत्त मुख्याध्यापक पितांबर देवरे यांच्या वतीने क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येते.
दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण शितल पोपट पवार या विद्यार्थिनीस रोख ११ रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.व्दितीय क्रमांक मिळविणाऱ्या हेमलता दरबार राठोड व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या कुंदन रामदास राठोड यांना अनुक्रमे ७ हजार ५०० व ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. यावेळी उर्मिला कोळी, भाग्यश्री कोळी या विद्यार्थिनींनाही बक्षीस देण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एम ए पाटील, मनिष करंकाळ,व्हि. वाय.पाटील, ए. इ.ईशी, ए. बी. बागल, बी. एम. पाटील, एम. एच. माळी, आर.एस.राठोड, व्हि. बी. पाटील, बी एम. पाटील, आर.जे.शिंदे, एल.एच.पवार, एच.एम. पाटील, एस. व्ही. बागल, एम. ई.पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जे बी जैन यांनी केले







