आटपाडी तालुक्यात वनविभागाच्या आशीर्वादाने वृक्षतोड जोमात
अधिकाऱ्यांचे लागेबंधे असल्याच्या चर्चेला उधान….. शासन म्हणतंय लावा झाडे जगवा तर अधिकारी म्हणतात झाडे तोडा आणि मालपाणी कमवा
शासनाची घोषणा झाडे लावा झाडे जगवा अधिकाऱ्यांची घोषणा झाडे तोडा मालपाणी कमवा
आटपाडी तालुक्यांमध्ये वृक्षतोड जोमात सुरू आहे. याकडे वन विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. वृक्षतोडीला वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा तालुक्यामध्ये रंगली आहे.
तालुक्यामध्ये वृक्षतोड कुठे चालू आहे, हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहित असते .परंतु चिरीमिरी साठी वृक्षतोडीकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे तालुक्यामध्ये वृक्षतोड फोफावली आहे.
वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांच्याबाबत नागरिकांतून उलट सुलट चर्चा सुरू आहे. वृक्ष लागवडीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात गोलमाल केला आहे. तसेच तालुक्यामध्ये त्यांच्याच आशीर्वादाने वृक्षतोड जोमाने सुरू आहे. या वृक्षतोडीकडे वन विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.
एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे .तर दुसरीकडे वृक्षतोड जोमात सुरू आहे. या वृक्षतोडीला वन विभागाचेच अधिकारी पाठबळ देत आहेत.
तालुक्यामध्ये वृक्षांची संख्या कमी असल्याने, पाऊस काळ कमी झाला आहे. सतत दुष्काळ पडत आहे, तरीसुद्धा वनविभाग या गोष्टीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे. वृक्ष लागवडीसाठी शासन अतोनात प्रयत्न करीत आहे. एकीकडे वृक्ष लागवड होते .तर दुसरीकडे वृक्षतोड होते .या वृक्षतोडीला सर्वस्वी वन विभागच जबाबदार आहे.तरी वन विभागाने तालुक्यातील वृक्षतोड थांबवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वृक्षतोड जोमात सुरू आहे तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी







