नातेपुते येथे राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यत
नातेपुते प्रतिनिधी :
नातेपुते येथील माजी पोलिस पाटील समाजरत्न राजेंद्र हनुमंत पाटील यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आलेले आहे अशी माहिती अतुल पाटील व माऊली पाटील मित्र परिवार व संदीप ठोंबरे मित्र परिवार नातेपुते यांच्यावतीने नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालया जवळ 46 फाटा येथे होणार आहे.
या बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस 71 हजार रुपये द्वितीय बक्षीस 51 हजार रुपये तृतीय बक्षीस 41 हजार रुपये चौथे बक्षीस 31 हजार रुपये पाचवे बक्षीस 21 हजार रुपये सहावे बक्षीस 11 हजार रुपये सातवे बक्षीस 7 हजार रुपये आहे. या बैलगाडी शरदी पारदर्शक होणारा असून पंचांचा निर्णय अंतिम राहील. या कार्यक्रमाला सकाळी नऊ वाजता सुरुवात होईल.
या बैलगाडी शर्यतीत जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक संयोजक सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल पाटील माऊली पाटील मित्र परिवार नगरसेवक रणजित पांढरे आण्णा पांढरे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीपदादा ठोंबरे यांनी केले आहे
बैलगाडी शर्यत (संग्रहित फोटो)







