.
बैलपोळ्याच्या सणाचा उत्साह कमी होत चालला
सततच्या दुष्काळाने पशुधनाची संख्या लागली घटू
बैलपोळा सण होतोय दुर्मिळ
त-हाडी
बैलपोळा आला की शेतकरी आपली तयारी सुरु करतात बैलजोडीस व इतर पाळीव प्राज्यांना सजवण्यासाठी झुल, सुत विणकाम करणे, बेगड, चंगाळ, घंटी, दोर, कंडा, गोंडा आदि साहित्य आणून बैल पोळा साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी गावातून अनेक बैलजोड्यांच्या मोठ्या उत्साहात मिरवणुका निघायच्या आणि अनेक गावकरी या मिरवणुका पाहण्यासाठी गावच्या वेशीवर मारूती पारावर जमा व्हायचे. गावातून चाढे घेऊन चाऊर-चाऊर चांगभल, पाऊस आला घरी चला असे म्हणत गावातून बैलजोड्यांच्या मिरवणुका, लग्न लावत असे. पण सध्याचे बैलपोळा हा सण दुर्मिळ होत त्याची जागा आधुनिक तंत्रज्ञान घेत असून नावापुरता बैलपोळा सण साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.
बैल पोळा हा सण कृषीप्रधान आहे. शेतामध्ये नांगरणी, पेरणी, पाळी आदी कामे राबणाऱ्या जनावरांना एक दिवसाचा आराम म्हणून बैलपोळा दिवशी बैलांना कोणतेही काम लावले जात नाही. तो दिवस म्हणजे बैल पोळा होय. कोरोना रोगांच्या दोन वर्षांच्या लाटेनंतर यंदाचा बैलपोळा सण निर्बंध मुक्त दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी साजरा झाला. परंतु आज पशुधनाची बैलजोडयांचे प्रमाण कमी झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ट्रॅक्टर व अत्याधुनिक अवजारे, यंत्रे आल्याने ट्रॅक्टर व विविध शेती उपयोगी कामे होत आहे. तसेच दुष्काळामुळे पशुधन जगवणे मुश्किल झाल्यामुळे पारंपारिक बैलपोळ्याची जागा आधुनिक तंत्रज्ञान घेत असून कृषीविषयक सणाचे महत्त्व कमी होत आहे.
पशुधन जगविने अवघड बनले
शेतकऱ्यांना शेतीसाठी मशागत करण्यासाठी पशुधन जगविने अवघड बनले आहे. त्यातच वाढती महागाई यामुळे बैल पोळ्यासाठी लागणारे साहित्याचा खर्च आज लहान लहान व गरीब शेतकऱ्यांना पेलवत नाही. दुकानातून साहित्य खरेदी ही कमी होत आहे. त्यामुळे आज बैलपोळा हा सण दुर्मिळ होत त्याची जागा आधुनिक तंत्रज्ञान घेत असून नावापुरता बैलपोळा सण साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.
————-//
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे आज पशुधनाची संख्या घसरणीवर जात आहे. यामुळे बैलपोळ्याच्या सणाचा उत्साह कमी होत चालला आहे. परंतु ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात बैलपोळा सण श्रावण महिन्यातील दर्श पिठोरी अमावास्येच्या दिवशी दि. २६ ऑगस्ट रोजी साजरा झाला. पण बैलपोळ्याच्या सणाचा उत्साह व कमी होत चालला असून सततच्या दुष्काळाने पशुधनाची संख्या घटत
मुक्या जनावराच्या उपकाराची उतराई…!
कष्टाशिवाय मातीला आणी बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही शेतीत राबराबणा-या बैलाचा सण म्हणजे पौळा होय त्या मुक्या जनावराच्या उपकाराची उतराई म्हणुन परंपरागत पौळा सनानिमीत्त शिरपूर येथे त-हाडी येथील आदर्श शेतकरी नरेंद्र सोनवणे व सोनवणे परिवारानी सर्जाराजाची पुजा केली







