सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदिपन सोहळा संपन्न
पिलीव प्रतिनिधी/विश्वजीत गोरड-
गत हंगामात विक्रमी गाळप केल्यानंतर यंदाच्या 2022-2023 सालच्या गाळपासाठी सद्गुरु श्री श्री साखर कारखाना सज्ज झाला आहे.
गेली दोन महिने झाले कारखान्याची मशनरी साफ सफाई,डागडुजी केल्यानंतर आज सद्गुरु कारखाना पुढील गाळप हंगामासाठी सज्ज झाला याच्या पार्श्वभूमी वर आज बाॅयलर अग्नी प्रदिपन सोहळा पार पडला, सुदर्शन होम वहन करुन त्या होमातील अग्नीने कारखान्याचे चेअरमन शेषागिरी राव, व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर, संचालक मोहन आप्पा बागल यांच्या शुभ हस्ते बाॅयलर प्रज्वलित केला .
यावेळी कार्यक्रमात बोलताना केन मॅनेजर सुनिल सावंत यांनी यंदा अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय ठेवले त्यानुसार वाहतुकदार व ऊस उत्पादक सभासद यांच्याकडुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सदर अग्नी प्रदिपन सोहळयाला कारखान्याचे जनरल मॅनेजर रामाराव , डेप्युटी जनरल मॅनेजर शहाजी पाटील,कोजन मॅनेजर बसवराज, चिफ केमिस्ट नागेश पवार, डिसलरी मॅनेजर लालासो पाटील,शेती अधिकारी अतुल नाईकनवरे व दत्ता क्षिरसागर, एच आर एडमिन सचिन खटके, असिस्टंट एच आर एडमिन युवराज भंडारी, सिव्हील इंजिनियर अवधुत जमदाडे, इलेक्ट्रिक मॅनेजर अभिनित तिवारी,सुरक्षा अधिकारी भगवान वाघमारे, पर्यावरण अधिकारी किशोर कुमार यासह अधिकारी, कर्मचारी ,वाहतुकदार, ऊस उत्पादक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते







