खान्देशात भालदेव पुजनाची पंरपरा आजही टिकून आहे
अष्टमीनिमित्त आज होणार विसर्जन ,
परस्परात स्नेह निर्माण करणारा सण
त-हाडी (प्रतिनिधी)
खान्देशात पंरपरागत चालत आलेले अनेक सण उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात भारतीय संस्कृतीत दगडालाच नव्हे तर शेणालाही पुजले जाते यांचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे खान्देशातील भालदेव सण भालदेव उत्सवाची अनोखी पंरपरा ग्रामीण भागात आजही टिकून आहे असून ग्रामीण भागात घरोघरी भालदेवाचे पुजन केले जात आहे तारीख ४/९/२२ अष्टमीला भालदेवाचे विसर्जन केले जाईल खान्देशातील ग्रामीण भागात पोळ्यापासुन ते दिवाळीपर्यंत स्थानिक सण उत्सवाची रेलचेल असते या सणाची कुठल्याच दिनदर्शिकेत नोंद नसते पण हे सण रूढी पंरपरा जोपासताना परस्परात स्नेह निर्माण करतात एकसंधपणाची भावना त्यातून निर्माण होते उपवासाच्या श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोळा साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेव उत्सवाला प्रारंभ होतो भारत कुषिप्रधान देश असल्यामुळे दुभत्या पशूंना देव मानण्याची पंरपरा आहे त्या देवतांची पुजा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो
असा होतो साजरा सण
खान्देशात भालदेव उत्सव साजरा करण्याची अनोखी पद्धत पूर्वापार सुरू आहे श्रावण अमावास्येला दुसऱ्या दिवशी भालदेवाची विधिवत स्थापन केली जाते भालदेवाचे आगमन झाल्यानंतर घरातील कुठलीही वस्तू विकली जात नाही किंवा बाहेरही जाऊ दिली जात नाही त्यामुळे एक प्रकारे सर्वच व्यवहार ठप्प होतात या काळात दुभत्या जनावरांचे संपूर्ण दुध घरातच ठेवले जाते दुधापासून दही ताक, बनविले जाते शेजाऱ्यांना व गल्लीतील लोकांना घरी बोलावून ताक प्राशन करण्यास दिले जाते पंरतु हे दुधाचे पदार्थ दुसऱ्याच्या घरी देता येत नाही
पुजेची अनोखी पद्धत
ज्याच्या घरी दुभती जनावरे आहेत त्याचा ओला भालदेव व ज्याच्याकडे दुभती जनावरे नसतील त्याच्याकडील भालदेवाला कोरडा भालदेव म्हटले जाते भालदेव उत्सव पाच,सात,नऊ, दिवसाचा साजरा केला जातो शेवटच्या दिवशी रुईच्या पाच किंवा सात पानावर गायीच्या शेणाचे गोळे करून ठेवले जातात त्यावर पाढऱ्या रंगाचे दगड किंवा कवड्या ठेवल्या जातात पुजेसाठी रुईची पाने व लव्हाळी आणली जाते भालदेवावर दुध भात शिंपडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविले जाता त्याचप्रमाणे केरसुणी व ताक बनविण्यासाठी लागणारी रही (रवी) हिचीही पुजा केली जाते अष्टमील विधिपूर्वक भालदेवाचे विसर्जन केले जाते.







