भोरखेडा आर.सी.पटेल विद्यालयात शिक्षक दिन साजरा
त-हाडी
आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्या दिवसाच्या प्राचार्या मिनाक्षी जाधव होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाखेचे प्राचार्य आर.एफ.शिरसाठ , पर्यवेक्षक पी.व्ही.पाटील तसेच त्या दिवसाच्या पर्यवेक्षिका बनलेली रुतिका राजपूत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.
इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका करताना अध्यापनाचे कार्य केले. अध्यापन करतांनाचे आलेले अनुभव विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करतांना कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षकांप्रती असलेल्या कृतज्ञतेपोटी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा यथोचित सन्मान केला.
प्रमुख पाहुणे प्राचार्य आर.एफ.शिरसाठ यांनी आपल्या मनोगतातून गुरु परंपरा, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनप्रवास याबरोबरच विद्यार्थी घडवतांना शिक्षकांचे योगदान आणि विद्यार्थी भवितव्य याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई राजपूत याने केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा चौधरी व रुतिका राजपूत यांनी केले तर सोनू शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री के.एस.कोळी,एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी एन.वाय.बोरसे,एन.डी.चव्हाण,आर.जी.पाटील,एस.जे.पाटील,एस.एन.पाटील,एस.एम.पाटील,एस.आर.देसले,पी.टी.चौधरी,व्ही.बी.शर्मा,व्ही.एस.इशी,जे.डी.पाटील, एस. एस. निकुंभे,एम.टी.पटेल, दिपाली निकम,काजल राजपूत, तुषार पाटील, आफ्रिद पटेल, आवेश काजी, चंदन पावरा, संजय चौधरी, जाधव जी.टी. आहिरे डी.एस.अनिल खुटे, विवेकानंद पवार, केवळ सिंग राजपूत, शांतीलाल शिरसाट यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले







