ग्रामीण तसेच शहर भागातील पत्रकारांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणार – केंद्रीय अर्थमंत्री डॉ . भागवत कराड
त-हाडी – ( प्रतिनिधी ) दि ५
तळागाळात कार्य करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री डॉ . भागवत कराड यांनी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे या संदर्भात दिलेल्या निवेदन प्रसंगी व्यक्त केले .
केंद्रीय वित्त राज्यमंत्री यांना महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघ ( महा – राज्य ) यांच्या वतीने पत्रकारांसाठी शासकीय योजनेच्या माध्यमातून मदत व कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते . हे निवेदन स्वीकारल्यानंतर लगेचच केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना ठोस आश्वासन देत सांगितले की जो कोणी पत्रकार आपल्या जवळील राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्याला लागेल त्या व्यवसायासाठी कर्ज प्रकरण दाखल करेल . त्याला ते कर्ज त्वरित मंजूर करून देण्यासाठी मी तयार आहे पत्रकारांनी मुद्रा लोन, पीएमजीइपी ,पंतप्रधान आवास, योजना, अशा जे काही शासकीय लाभाच्या योजना असतील त्या माध्यमातून सर्व पत्रकारांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात मी तयार आहे फक्त पत्रकारांनी सर्व कागदपत्र व्यवस्थित लावून बँकेमध्ये प्रकरण दाखल करावे व त्याची एक प्रत माझ्या कार्यालयात द्यावी माझ्या कार्यालयातर्फे त्याच्या पाठपुरावा करून संबंधित पत्रकाराला कर्ज तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल, मुलांसाठी शैक्षणिक कर्ज, देण्यात येतील .
या व्यतिरिक्त आणखी काही विमा, आरोग्य, यासारख्या योजनाही आहेत त्या माध्यमातून पण मी पत्रकारांना जितक्या जास्त सुविधा देता येतील त्यासाठी मी प्रयत्न करेल असेही त्यांनी यावेळी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आवर्जून सांगितले
व केंद्रशासन सर्व तळागाळापर्यंत काम करणाऱ्या पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे . आपण काळजी करू नये अशी यावेळी केंद्रीय अर्थ मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आवर्जून सांगितले . यावेळी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब काळे , राष्ट्रीय कार्याध्यक्ष – सुनील वैद्य , राष्ट्रीय सचिव – प्रकाश सातपुते, ‘ राष्ट्रीय उपाध्यक्ष – सुधीर खैरे, इम्रान पठाण, पांडुरंग गायकवाड , बी एम राठोड , साजिद पठाण , विजय शिंदे , राजू आल्हाट रावसाहेब चव्हाण डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे, महेंद्र खोंडे, भिका चव्हाण, ललिता खोंडे यांच्या सह अनेक पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती .







