अहिल्यापूरच्या विद्यालयात कवी मुलांच्या भेटीला
त-हाडी – प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी.पटेल माध्यमिक विद्यालयात पाठ्यपुस्तकातील कवी लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत येता दहावीच्या पाठ्यपुस्तकातील मणक्या पेरेण लागा या कवितेचे कवी वीरा राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन. गोसावी यांनी वीरा राठोड यांचे स्वागत केले. माणुसकी पेरण्याची गरज कशी आहे आणि मणक्या पेरेण लागा या कवितेची निर्मिती प्रक्रिया कवी वीरा राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनातून उलगडून दाखवली.
तसेच निसर्ग ही फार मोठी शक्ती असून निसर्ग संपदेचा उपभोग घेताना निसर्गाला परत देण्यासाठी विद्यार्थ्यांनी तत्पर असले पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या असे आवाहन कवी वीरा राठोड यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांच्या वतीने हर्षदा राजपूत हिने प्रतिक्रिया दिली.आभासी पटलावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विषय शिक्षक एस.एन.पाटील यांनी केले, तर व्ही. बी. चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी डी.व्ही. जावरे यांनी सांभाळल्या. कवी मुलांच्या भेटीला हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.







