नातेपुते येथील श्रीगणेश प्रतिष्ठान मंडळ देखाव्यात प्रथम क्रमांक :
नातेपुते(प्रतिनिधी ):
नातेपुते येथे दरवर्षी प्रमाणे ग्रामपंचायत व आता नगरपंचायत नातेपुते व नातेपुते पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक गणेश उत्सवानिमित्ताने त्या मंडळास सादर केले जातात. यातून गणेश मंडळास सामाजिक ऊर्जा प्रेरणा मिळावी यासाठी उपक्रमाचे आयोजन आम्ही दरवर्षी करीत आहोत,
अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे दोन वर्ष उत्सव होऊ शकला नाही आणि २०१९ चा प्रथम क्रमांक श्रीगणेश प्रतिष्ठान मंडळ यांना देण्यात आला द्वितीय क्रमांक हनुमान गणेशोत्सव मंडळ व तृतीय क्रमांक छत्रपती गणेशोत्सव मंडळ यांना देण्यात आला.
यावेळी नातेपुते नगरीचे नगराध्यक्षा उत्कर्षराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नातेपुते पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रवीण संपांगे, माजी सरपंच व नगरसेवक अॅड बी वाय राऊत वकिलसाहेब, नगरसेवक अतुल पाटील, रणजित पांढरे, आण्णा पांढरे, अविनाश दोशी, यांच्या हस्ते मंडळांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच बाळासाहेब काळे रणवीर देशमुख, नंदकुमार लांडगे,ज्ञानेश्वर माऊली उराडे, संदीप दादा ठोंबरे, शक्ति पलंगे, शेखर अटक, तसेच नगरपंचायत व पोलीस स्टेशनचे कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सह ग्रामस्थ उपस्थित होते,







